Home /News /mumbai /

Maharashtra Lockdown updates: फडणवीसांनी सांगितलं कुठे चुकतंय? सर्वपक्षीय बैठकीत मांडले 'हे' मुद्दे

Maharashtra Lockdown updates: फडणवीसांनी सांगितलं कुठे चुकतंय? सर्वपक्षीय बैठकीत मांडले 'हे' मुद्दे

Maharashtra Coronavirus Updates: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

मुंबई, 10 एप्रिल: राज्यातील कोरोना विषाणूची साखळी (Coronavirus Chain) तोडायची असेल तर सलग 10 किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन (Strict Lockdown) लावण्याच्या प्रस्तावा संदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी (CM meeting with all party leaders) चर्चा केली. लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे असं या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन भाष्य केलं आणि राज्य सरकारचं कुठं चुकत आहे हे सुद्धा दाखवून दिलं. बैठकीत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे. रेमडिसिवीर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत. रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल." जनतेचा उद्रेक लक्षात घेऊन निर्णय जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा. सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परीस्थित कस घर चालवायचं असा प्रश्नं आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा. ज्यांचं काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? कोरोनाची चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील मिळतील याची व्यवस्था करणं आवश्यक आहे - देवेंद्र फडणवीस रेमडेसीविर संदर्भात खासगी हाँस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीये.. फक्त सरकारी हाँस्पिटलमध्ये उपलब्धता नको खासगी हाँस्पिटलमध्येही हवेत - देवेंद्र फडणवीस रेमडिसिवीर तात्काळ कसे उपलब्ध कसे देता येईल - देवेंद्र फडणवीस जनतेमधील उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांच्या दृष्ठीने निर्णय घ्यावा लागेल. काही जण तर आम्ही मलो तरी चालेल पण आम्हाला धंदा करू द्यात असं म्हणणारे आहेत, त्यासाठी आपण अशा लोकांचाही विचार करावा - देवेंद्र फडणवीस सर्व कर आणि कर्ज फेडावं लागत आहे अशा परीस्थित कस घर चालवायचं असा प्रश्नं आहे - देवेंद्र फडणवीस काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा - देवेंद्र फडणवीस ज्यांचं काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावं - देवेंद्र फडणवीस काय काय चालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यावा - देवेंद्र फडणवीस ज्यांचं काम सुरू करता येणार नाही त्यांच्यासाठीही काय करता येईल हे देखील पहावं - देवेंद्र फडणवीस लहान उद्योजक आणि हातावर पोट असणार्यांचा देखील विचार करावा - देवेंद्र फडणवीस आत्ताची परीस्थितीत आर्थिक बोजा वाढला तरी अशा लोकांसाठी काहीतरी आर्थिक मदत करण्यासाठी विचार करावा - देवेंद्र फडणवीस वीज बील संदर्भातही विचार करावा वीज कनेक्शन कट करत आहेत... त्याचाही विचार करावा - देवेंद्र फडणवीस केश कर्तनालय यांच्या समोर असा प्रश्नं आहे की काय खायचं त्यांचाही विचार करावा - देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी काय सूट देता येईल का - देवेंद्र फडणवीस आपण सर्वांची नुकसान भरपाई करता येणार नाही - देवेंद्र फडणवीस पण जगता येईल याचा विचार करावा - देवेंद्र फडणवीस लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी नियोजन करावं लागेल - देवेंद्र फडणवीस परस्थिती समजून निर्णय घ्यावा - देवेंद्र फडणवीस कडक लॉकडाऊन लावण्याच्या राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे देखील सहभागी होते. या कारणासाठी कडक लॉकडाऊन  येत्या 12 ते 18 एप्रिल या काळात दोन सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यामुळे फक्त गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस अधिकृत कामाचे असणार आहेत. त्याला लागूनच पुढील शनिवार आणि रविवार विकेंडचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. यामुळे दोन दिवसांसाठी नागरिकांची कामाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलग लॉकडाऊन केला तर नागरिकांची गर्दी टाळता येईल आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करता येईल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Devendra Fadnavis, Lockdown, Maharashtra

पुढील बातम्या