मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराटसोबत तुलना पण यश नाही, अखेर भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती

विराटसोबत तुलना पण यश नाही, अखेर भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती

भारताच्या अंडर-19 टीमचा माजी कर्णधार उनमुक्त चंद (Unmukt Chand) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. उनमुक्त चंदने भारताला 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवला.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 ऑगस्ट : भारताच्या अंडर-19 टीमचा माजी कर्णधार उनमुक्त चंद (Unmukt Chand) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. उनमुक्त चंदने भारताला 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवला. कर्णधार असलेल्या उनमुक्तने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकत टीमला चॅम्पियन बनवलं होतं, यानंतर त्याची तुलना विराट कोहलीशी (Virat Kohli) होऊ लागली, कारण विराटही अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून भारतीय टीममध्ये दाखल झाला होता.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मात्र उनमुक्त चंदच्या करियरला उतरती कळा लागली. स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्येही (IPL) उनमुक्तची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चंद आता परदेशी लीगमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. उनमुक्तचं वय फक्त 28 आहे, त्यामुळे तो अमेरिकेच्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

उनमुक्त चंदने शुक्रवारी ट्वीट करून चाहत्यांना आपल्या निवृत्तीची माहिती दिली. याचसोबत त्याने आपल्या क्रिकेटच्या मैदानावरच्या आठवणींचा व्हिडिओदेखील शेयर केला. उनमुक्त चंदकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात होतं, पण फक्त 28 व्या वर्षी त्याच्यावर निवृत्ती घ्यायची वेळ आली.

उनमुक्त चंदने 67 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 31.57 च्या सरासरीने 3,379 रन केले, यात 8 शतकांचा समावेश होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये उनमुक्त चंदने 41.33 च्या सरासरीने 4,505 रन केले, ज्यात 7 शतकं होती. टी-20 क्रिकेटमध्येही त्याने 3 शतकं केली, पण त्याची सरासरी फक्त 22.35 एवढी होती.

First published:

Tags: Cricket, Virat kohli