मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आर्मी ऑफिसर असल्याचं सांगत करायचा ऑनलाईन चॅटिंग; अनेक तरुणींना गळाला लावलं; आईवडिलांच्या डोळ्यात धूळफेक

आर्मी ऑफिसर असल्याचं सांगत करायचा ऑनलाईन चॅटिंग; अनेक तरुणींना गळाला लावलं; आईवडिलांच्या डोळ्यात धूळफेक

आपण आर्मी ऑफिसर (Army Officer) असल्याचं सांगून अऩेक तरुणींशी ऑनलाईन चॅटिंग (Online chatting) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

आपण आर्मी ऑफिसर (Army Officer) असल्याचं सांगून अऩेक तरुणींशी ऑनलाईन चॅटिंग (Online chatting) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

आपण आर्मी ऑफिसर (Army Officer) असल्याचं सांगून अऩेक तरुणींशी ऑनलाईन चॅटिंग (Online chatting) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 13 ऑगस्ट : आपण आर्मी ऑफिसर (Army Officer) असल्याचं सांगून अऩेक तरुणींशी ऑनलाईन चॅटिंग (Online chatting) करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. आर्मी ऑफिसर होण्याचं स्वप्न घेऊन घराबाहेर पडलेला हा तरुण प्रत्यक्षात मात्र ऑफिसर होऊ शकला नाही. मात्र घरच्यांना आपण आर्मीत असल्याचं सांगून प्रत्यक्षात तो चोऱ्यामाऱ्या आणि ऑलनाईन फ्रॉड करत असल्याचं दिसून आलं.

सैन्यात भरती होण्याचं स्वप्न

राजस्थानमधील जबलपूरच्या विकास नामदेव या तरुणाला आर्मीत ऑफिसर म्हणून भरती व्हायचं होतं. त्यासाठी तो तीन वेळा जबलपूरलाही गेला होता. मात्र त्याची निवड होऊ शकली नाही. ही बाब त्यानं आईवडिलांपासून लपवली आणि आपण मिलिट्रीत भरती झाल्याचं त्यांना सांगितलं. प्रत्यक्षात मात्र तो कोटामधील एका हॉटेलमध्ये आर्मी ऑफिसर असल्याचं सांगून राहत होता. त्यानं फेसबुकवर सागर नावाचं अकाऊंट काढलं होतं आणि आर्मी युनिफॉर्ममधील फोटो टाकून तरुणींना प्रभावित करण्याचा तो प्रयत्न करायचा.

विकत घेतले आर्मीचे कपडे

त्यानं जवळच्या टेलरकडून आर्मीप्रमाणे कपडेही शिवून घेतले होते. बाजारातून आर्मीसारखा बेल्टही आणला होता. एका कापड दुकानात नोकरी करून तो चरितार्थ चालवत होता, तर नोकरीव्यतिरिक्त रिकाम्या वेळेत तो रेल्वेत शिरून छोट्या मोठ्या चोऱ्या करत असे. एकदा तर त्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या काही मिलिटरी जवानांच्या साहित्याची चोरी केली. त्यात एका जवानाचं ओळखपत्र त्याच्या हाती लागलं.

हे वाचा -धोका वाढला! राज्यात डेल्टा + प्लस व्हेरिएंटच्या मृतांची संख्या तीनवर

ओळखपत्राचा गैरवापर

या ओळखपत्रातील फोटो हा स्वतःशी मिळताजुळता असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं त्याचा वापर करून हॉटेलमध्ये रुम मिळवली आणि तिथे राहू लागला. सतत आर्मीचा गणवेश आणि ओळखपत्र दाखवून तो हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आपली ऐट दाखवायचा प्रयत्न करत असे. दोन वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या विकासने सूरत, दिल्ली आणि कोटा अशा वेगवेगळ्या शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आणि फावल्या वेळात तो चोऱ्या करत असे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून इतके दिवस बोगस ओळखपत्रानिशी राहणारा हा इसम पोलिसांच्या नजरेत कसा आला नाही, याचंच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime, Online crime, Rajasthan