Home /News /mumbai /

BREAKING : 25 वर्षांपुढील सर्वाना लस द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

BREAKING : 25 वर्षांपुढील सर्वाना लस द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

'कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे'

    मुंबई, 5 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे मिनी लॉकडाऊन (weekend lockdown) जाहीर करण्यात आला आहे तर दुसरीकडे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आता राज्यातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. रोहित पवारांनी मानले गडकरींचे आभार; हे आहे कारण मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती.  आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे. मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. 'राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील  अशी कार्य पद्धती ठरविली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. युजर्स स्वत:च करु शकणार फेक न्यूजची ओळख; Google ने शेअर केल्या खास टिप्स
    'कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. दीड कोटी डोस मिळावेत लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरिता दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: उद्धव ठाकरे

    पुढील बातम्या