मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रोहित पवारांनी मानले गडकरींचे आभार; हे आहे कारण

रोहित पवारांनी मानले गडकरींचे आभार; हे आहे कारण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. 399 कोटींबद्दल आता त्यांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. 399 कोटींबद्दल आता त्यांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. 399 कोटींबद्दल आता त्यांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

अहमदनगर, 05 एप्रिल : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी गडकरींची भेट घेत त्यांच्या मतदारसंघातील आढळगाव - जामखेड महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी ही मागणी मंजूर करत कामासाठी 399.33 कोटींचा निधीही मंजूर केला. त्यासाठी रोहित पवार यांनी गडकरींचे आभार मानले आहेत.

रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट करत गडकरी यांचे मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत. मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या मार्गाच्या विकासामुळे मतदारसंघाला मोठा फायदा होणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या रस्त्यासाठी भरीव निधी दिल्याने काम पूर्ण होऊन नागरिकांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल, असं रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणाचे सुखद चित्र, पुन्हा एकदा ठाकरे बंधू आले एकत्र, निमित्त

न्हावरा ते काष्टी, श्रीगोंदा मार्गे जामखेड या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यावरील आढळगाव - जामखेड या मार्गाच्या दोन लेनचं चौपदरीकरण होणार आहे. 399.33 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीसाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासातही याची मदत होणार आहे.

वाचा - WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक

रोहित पवार यांनी या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. नितीन गडकरींची त्यांनी दोन वेळा भेट घेतली होती. त्यांच्या याच पाठपुराव्याला यश आलं आहे. या मार्गाचं काम 18 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून त्यानंतर 10 वर्षांसाठी त्याच्या डागडुजीचा काळ ठरवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

First published:

Tags: Nitin gadkari, Rohit pawar