मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई महापालिकेच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती, मुंबईकरांना तात्पुरता दिलासा

मुंबई महापालिकेच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती, मुंबईकरांना तात्पुरता दिलासा

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अग्निशमन शुल्काच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अग्निशमन शुल्काच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अग्निशमन शुल्काच्या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

मुंबई, 9 जुलै : 2014 पासून ते आता पर्यंत नव्या इमारतीमध्ये (New buildings) स्थायिक झालेल्या मुंबईकरांवर कराचा नवा बोझा (Tax for Mumbaikars) पडण्याची शक्यता आता थोडी पुढे ढकलली गेली आहे. 2014 ला निर्णय होऊनही मुंबई महापालिकेनं आतापर्यंत विकासकाकडून हा निधी घेतला नाही आणि आता मात्र अचानक त्याच्या वसुलीचे आदेश देण्यात आले. या काळात या इमारतीमध्ये राहायला आलेल्या हजारो मुंबईकरांना हा भुर्दंड सहन करावा लागला असता. पण त्याला भाजप आमदार अमित साटम यांनी जोरदार विरोध केला आणि ही नवी वसुली ताबडतोब थांबवावी अशी मागणी केली. यामुळे मुंबई महापालिका तब्बल 5000 कोटी रुपयांची वसुली मुंबईकरांकडून करणार आहे का? विकासकांनी (Developers) भरायची रक्कम मुंबईकरांनी का भरायची असासावल त्यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने याच मुद्यावर सभात्याग केला. तर महापालिकेतील इतर पक्षांनीही त्याला विरोध करत हा प्रस्ताव तात्पुरता स्थगित केला आहे. पण हे केवळ आजचे मरण उद्यावर ढकलले गेले आहे. महापालिकेकडे या काळात किती इमारतीकडे हे शुल्क वसूल करायचे आहे. याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे याचा परिणाम किती मुंबईकरांवर होईल, त्यातून किती कर गोळा होईल. कोणत्या विकासकांनी या इमारती विकसित केल्या ही सर्व माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ही  माहिती गोळा होईपर्यंत तरी हा निर्णय थागित करण्यात येत असल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयामुळे केंद्र विरुद्ध राज्य नव्या संघर्षाची चिन्ह

फेब्रुवारी 2022 मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा निर्णय लागू करणे कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय तात्पुरता जरी मागे घेतला गेला असला तरी त्याची टांगती तलवार कायम आहे. आता याबाबतचा निर्णय नवीन स्थायी समितीचे सदस्य करतील असे दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूक होईपर्यंत मालमत्ता कर, अग्निशमन शुल्क, पाणी पट्टी यापैकी काहीही वाढणार नाही. पण निवडणूक होतच मालमत्ता कर आणि पाणी पट्टी बरोबर अग्निशमन शुल्क नावाचा नवा कर मुंबईत गेल्या 8 वर्षात नवं घर घेतलेल्या मुंबईकरांना भरावा लागणार आहे. त्यामुळे आजची स्थगिती म्हणजे आजचे मरण उद्यावर इतकाच काय तो प्रकार झाला आहे.

बार मालकाचा आनंद गगनात मावेना; दारूबंदी उठवल्याने वडेट्टीवारांची आरती करुन पूजा, VIDEO VIRAL

तसेच या आधी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी टाळणे शक्य नाही आणि तसे करायचे झाल्यास त्यासाठी स्थायी सभेत प्रस्ताव आणून तो पुन्हा मंजूर करावा लागणार आहे. त्यामुळे एकूणच या निर्णयापासून मुंबई महापालिका माघार घेईल असे दिसत नाही.

First published:

Tags: BMC, Mumbai