हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 9 जुलै : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारू 6 वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. राज्य सरकराने (Maharashtra Government) घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक दारू विक्रेत्यांना इतका आनंद झाला आहे की त्यांनी चक्क मंत्री महोदयांची आरती करुन पूजा केली आहे. दारुबंदी उठविणाऱ्या (lifts alcohol ban) पालकमंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची बार मालकाने फोटो लावून केलेली पूजा आणि आरतीचा व्हिडीओ व्हायरल (Vijay Wadettiwar Pooja and Aarti video viral) झाला आहे. या व्हिडीओची आता सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा एक फोटो मालकाने लावला. बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून पूजा आणि आरती केली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. चंद्रपुरात दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी बार मालकाने हे केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयामुळे केंद्र विरुद्ध राज्य नव्या संघर्षाची चिन्ह
या बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी केली वडेट्टीवार यांची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील 750 बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून तळीराम बंदी उठल्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या 3 दिवसात सुमारे 1 कोटींची दारू तळीरामानी रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेल्याची भावना बारमालकाने व्यक्त केली.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक आणि बारमालक-त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिल्याने हे अनंत उपकार विसरणार नसल्याची प्रतिक्रिया बार मालक गणेश गोरडवार याने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur