Home /News /mumbai /

BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका

BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका

मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका

मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणात अनेक दिग्गजांना फटका बसला आहे.

मुंबई, 31 मे : मुंबई शहराच्या महापालिका निवडणुकीचे (BMC Election 2022) बिगुल आज खऱ्या अर्थाने वाजले आहे. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वाँर्डासह आज मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत (ward reservation lottery) काढण्यात आली. या वॉर्ड आरक्षणानंतर मुंबई मनपातील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. तर काहींचे वॉर्ड हे सुरक्षित राहिले आहेत. मुंबईतील एकूण 236 वॉर्डसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यापैकी 118 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामध्ये 08 वॉर्ड हे अनुसूचित जातीसाठी, 01 वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी तर 109 वॉर्ड हे सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या आरक्षणानुसार, मुंबई मनपातील माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा 117 क्रमांक वार्ड सर्व साधारण महिला आरक्षित झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा 96 प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे अमेय घोले, काँग्रेसचे नेते आणि मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे प्रभाकर शिंदे यांना आपला वॉर्ड गमवावा लागल्याचं दिसत आहे. शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे. महिलांच्या आरक्षित  सर्वसाधारण - एकूण 109 वॉर्ड प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236. सर्वसाधारण महिला प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234. सर्वसाधारण महीला आरक्षित (२३) प्रभाग क्रमांक - 44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96, 9, 185, 130, 232, 53 वाचा : महाविकास आघाडीत निधीवरुन धुसफूस, श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान 15 प्रभागातून 8 प्रभाग स्त्रियांसाठी राखीव 139 अनुसुचित जाती महीला sc 190 अनुसुचित जाती महीला sc 194 अनुसुचित जाती महीला sc 165 अनुसुचित जाती महीला sc 107 अनुसुचित जाती महीला sc 85 अनुसुचित जाती महीला sc 119 अनुसुचित जाती महीला sc 204 अनुसुचित जाती महीला sc भाजप 27 टक्के ओबीसी उमेदवार देणार या आरक्षण सोडतीनंतर भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं, प्रभाग आरक्षण सोडतीनुसार निवडणूकांना समोर जाणार, भाजप पालिकेच्या निवडणुकेत 27 टक्के ओबीसी उमेदवार देणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. हे दुर्दैव आहे परंतु आम्ही ओबीसी आरक्षण राजकीय आणि शासकीय नसले तरी पक्षाकडून देण्यात येणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या