Home /News /mumbai /

BMC Election: मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण, वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप

BMC Election: मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण, वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप

मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; मुंबईतील वॉर्ड रचनेवरुन काँग्रेसचा शिवसेनेवर गंभीर आरोप

मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; मुंबईतील वॉर्ड रचनेवरुन काँग्रेसचा शिवसेनेवर गंभीर आरोप

BMC Election 2022 : वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

मुंबई, 1 जून : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी (BMC Election 2022) वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. या आरक्षणानुसार, मुंबईतील काही दिग्गज नगरसेवकांना फटका बसत आहे तर काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. पण या वॉर्ड पुर्नरचेनवरुन महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कारण, या वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसने (Congress) नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील वॉर्ड पुर्नरचनेवरुन महाविकास आघाडीतील शिवसेनेवर काँग्रेसने मोठा आरोप केला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केले. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि रवी राजा यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर वॉर्ड पुर्नरचनेवरुन काँग्रेसने न्यायालयात धाव घेण्याचाही निर्णय घेतला आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत वॉर्ड आरक्षणचा सर्वाधिक फटका काँग्रेसला मुंबईत काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा करण्यात आले. मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु , कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडले आहेत. वाचा : मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची काँग्रेस नेत्यांची भावना आहे. या संदर्भात येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणार आहेत. शिवसेनेकडून जाणिवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढु नये याकरता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढु असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले आहे. कोणत्या दिग्गजांना फटका?? रवी राजा , माजी विरोधी पक्ष नेते  काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा वॉर्ड 182 हा महिला आरक्षित झालाय. रवी राजांनाही आजुबाजूच्या वॉर्ड मध्ये शोधाशोध करावी लागणार आहे. मात्र, प्रभाग पुर्नरचनेमुळे सुरक्षित वॉर्ड मिळणं मुश्कील आहे. आसिफ झकेरिया, काँग्रेस माजी नगरसेवक पश्चिम उपनगरांतील उच्चभ्रु वस्तीतील मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे आसिफ झकेरिया यांचा पाली हिल परिसरातील 104 वॉर्ड महिला आरक्षित झाला आहे. कमरजहाँ सिद्दीकी, काँग्रेस माजी नगरसेविका  मंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी कमरजहाँ सिद्दीकी यांचा 48 क्रमांकाचा वॉर्ड सर्वसाधारण झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Election, Mumbai, Shiv sena

पुढील बातम्या