Home /News /mumbai /

BMC Election 2022: यंदाचा पावसाळा शिवसेनेला वाचवणार अन् भाजपला बुडवणार?

BMC Election 2022: यंदाचा पावसाळा शिवसेनेला वाचवणार अन् भाजपला बुडवणार?

यंदाचा पावसाळा शिवसेनेला वाचवणार अन् भाजपला बुडवणार?

यंदाचा पावसाळा शिवसेनेला वाचवणार अन् भाजपला बुडवणार?

BMC Election 2022: राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.

    मुंबई, 17 मे : राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका (Municipal Corporation election) पावसाळ्यानंतर घेण्यात याव्यात अशी विनंती करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) केला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ज्या भागांत पाऊस कमी पडतो त्या भागांत निवडणुका घेण्यास हरकत काय आहे? तसेच पावसाच्या संदर्भात राज्यातील जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यकर्म जाहीर करण्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. दोन टप्प्यांत निवडणुका? राज्यातील अनेक जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या कार्यकाळ संपलेला आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका लांबवणीवर पडल्या होत्या. त्याच दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी देताना राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याची सूचना केल्या. मात्र, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने कोर्टात धाव घेत निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. वाचा : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश सुप्रीम कोर्टाने म्हटलं, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण, मुंबई सारख्या भागात आम्ही निवडणूक आयोगाची पावसामुळे होणारी अडचण आम्ही समजू शकतो. या ठिकाणी पावसाळ्यानंतर निवडणुका घेऊ शकतो. त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा. त्यामुळे आता मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात निवडणुका या पावसाळ्यानंतर होण्याची दगाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या महानगरपालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. कारण, या भागात जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण अधिक असते. तर मराठवाडा आणि विदर्भात जून-जुलैमध्ये फार पाऊस नसतो त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. वाचा : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, BMW कार आणि एसटीमध्ये धडक पावसाळ्यानंतर मुंबईतील निवडणूक झाल्यास ओबीसी आरक्षणा संबंधित डेटा एकत्र करण्यासाठी हा वेळ वापरता येईल असे मत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीच्या काळात निवडणुका झाल्यात प्रचार आणि मतदारांपर्यंत आपल्या काम पोहोचवणं शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना सहज सोप्पं होईल. तर या निवडणुका पावसाळ्यात झाल्या असत्या तर त्याचा फायदा भाजपला झाला असता कारण, मविआच्या नेत्यांना आपल्या कार्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी आल्या असत्या. तसेच पावसाळ्यात मुंबईत होणारी रस्त्यांची दुर्दशा, जागोजागी पाणी साचणे तसेच वाहतूक कोंडी या सर्व मुद्द्यांवर भाजपने प्रचारात मविआची कोंडी केली असती. पण आता मुंबईसह एमएमआरडीए भागात पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने मविआला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीत निवडणुकीची रणधुमाळी? निवडणुकांचे नियोजन करत असाताना निवडणूक आयोगाला सुट्ट्यांचा विचार करावा लागतो. निवडणुकीच्या कामात शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना असलेल्या सुट्ट्यांच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    First published:

    Tags: BJP, BMC, Election, Shiv sena, Supreme court

    पुढील बातम्या