मुंबई 25 फेब्रुवारी : राज्यातल्या ठाकरे सरकार विरोधात भाजपने आज आंदोलनाचं रणशिंग फुंकले. सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. त्यामुळे राज्यभर भाजपने निदर्शनांचं आयोजन केलं होतं. मुंबईत आझाद मैदानात भाजपने आंदोलन केलं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज मुख्यमंत्री विधानसभेतून पळाले आणि असं म्हटल्यावर त्यांना राग आला. यांच्यापेक्षा मंत्रालयातले कर्मचारी जास्त काम करतात. ते पुढे म्हणाले, तुम्ही जोडतोड करुन सत्तेत आले आहात, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिळातले गुंडे बाहेर आलेत. तुम्हाला जिकडे आझादी मिळत असेल तिकडे जा. आमच्या पाच वर्षात पोलिसांची एकही गोळी उडाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारनं पहिल्या दिवसापासून सुरू केली. आम्ही लढून पुन्हा सत्तेत येऊ. आम्हाला आमच्या विश्वासघाताची चिंता नाहीये, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची आहे. तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे. पुण्यातील प्रोफेशनल डान्सर मौजमजेसाठी करायचा दुचाक्यांची चोरी, पोलिसांकडून अटक या पावसामुळे एखाद्याचा 18 वर्षांचा मुलगा गेल्यावर जसं वाटेल तसं पावसामुळे पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं आहे. आम्ही काळजीवाहू सरकार असताना शेतकऱ्यांना 10 हजार कोटी दिलेत. नवं सरकार आम्हाला मदत करेल असं शेतकऱ्यांना वाटलं. मात्र पूर्ण अधिवेशन झालं तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु असं यांनी सांगितलं होतं. आम्ही जाहीरनाम्यात नसताना शेतकरी कर्जमाफी दिली होती. किमान समान कार्यक्रमातही हे आश्वासन दिलं पण शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सुरु केलं. याच दराने यांनी कर्जमाफी केली तर 460 महिने कर्जमाफीला लागतील. तितका काळ हे सरकार तरी राहील का? आज धानाच्या खरेदीत भ्रष्टाचार होतोय. मराठवाडा वॉटर ग्रीडला यांनी स्थगिती दिली. पुण्याचा रिअल लाईफ हिरो, स्वत:च्या जीवाची बाजी लावून रोखला भीषण अपघात यातून मराठवाडा दुष्काळमुक्त झाला असतां. ग्रीडमध्ये काही अडचणी असतील त्या दूर करायच्या. ज्याला काम करायचं त्याला 17 बहाणे आहेत. यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. फक्त स्थगिती देणं आणि योजना बंद करणं एवढच काम या सरकारने केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.