Home /News /maharashtra /

पुण्याचा रिअल लाईफ हिरो, स्वत:च्या जीवाची बाजी लावून रोखला भीषण अपघात

पुण्याचा रिअल लाईफ हिरो, स्वत:च्या जीवाची बाजी लावून रोखला भीषण अपघात

कात्रज भागात विनाचालक धावणारी पीएमटी बघून लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता

    पुणे, 25 फेब्रुवारी : आज सकाळी पुण्यातील कात्रज परिसरात एक भीषण प्रकार समोर आला आहे. यावेळी विनाचालक पीएमटी धावताना पाहुन पुणेकरांच्या अंगावर काटाच उभा राहिला. पीएमपीएल वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे आज सकाळी 7.50 च्या सुमारास विनाचालक पीएमटी रस्त्यावर धावत सुटली. हे अंगावर थरकाप आणणारे दृश्य कात्रजकरांनी अनुभवले. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.30 नच्या सुमारास कात्रज चौकत नोकरदार वर्गाची व महाविद्यालयातल विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच भाजीवाल्यांचीही मोठी लगबगीने असते. अशा या गर्दीच्या ठिकाणी कात्रज पीएमटी डेपोतून ट्रॅव्हल टाइम या कंपनीची बस (क्र. R283,MH14 CW,1744)  कात्रज ते हौंसिग बोर्ड या मार्गाने जाणार होती. यासाठी ही बस स्वारगेटच्या दिशेने तोंड करुन लावण्यात आली होती. ही बस उतारावर लावण्यात आली होती. या बसचा चालक पिराजी दिवटे हा वाहकाला बोलवाण्यासाठी खाली उतरला. तोपर्यंत गाडीत कोणीही प्रवासी बसले नव्हते. मात्र नादुरुस्तीमुळे ही बस उतारावरुन खाली जाऊ लागली. तोपर्यंत कोणाचेही या बसकडे लक्ष नव्हते. तोच ही बस समोर उभ्या असलेल्या (क्र. MH12 QE7837 आणि MH12QE 7940) रिक्षांना जाऊन आदळली. यामध्ये रिक्षाचालक बाळासाहेब महारनवर आणि जावेद बेडगे हे दोघेही जखमी झाले आहेत. हेही वाचा -धनंजय मुंडे झाले ‘शिवकन्ये’चे बाप, रेल्वे ट्रॅकवरील मुलीचं स्वीकारलं पालकत्व शिवाय त्यांच्या रिक्षाचेही नुकसान झाले. ही बस इथपर्यंत थांबली नाही तर रिक्षांना धडकून कात्रजच्या मुख्य चौकाच्या दिशेने जाऊ लागली. यामुळे लोकांनी आरडा आरोडा सुरू केला. सर्वत्र धावपळ सुरू होती. अनेक रिक्षावाल्यांनी बसच्या समोर येणाऱ्या रिक्षा तातडीने हटवल्या. यावेळी बाजूला चहा पित उभा असलेल्या दिंगबर कोराळा याने हा थरार पाहिला. या टॅक्सी ड्रायव्हरने पाठीमागच्या दारातून धावत्या पीएमटीमध्ये प्रवेश केला. तोपर्यंत बस मुंबई बायपास चौकापर्यंत पोहोचली होती. समोर सिग्नल लागल्याने गाड्या उभ्या होत्या. दिंगबर चालत्या बसमधून शिरला आणि थेट चालकाच्या सीटच्या दिशेने धावला. सिग्नलला उभ्या असलेल्या गाड्यांना बस आदळणार तोच त्याने ब्रेक दाबला आणि गाडी जागेवरच थांबली. दिंगबर याच्या धाडसासाचे मोठे कौतुक केले जात आहे. त्याने प्रसंगावधान राखून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बसमध्ये जाऊन गाडी थांबवली. या प्रकारात जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: #Pune, At pune, Katraj, PMT

    पुढील बातम्या