जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील प्रोफेशनल डान्सर मौजमजेसाठी करायचा दुचाक्यांची चोरी, पोलिसांकडून अटक

पुण्यातील प्रोफेशनल डान्सर मौजमजेसाठी करायचा दुचाक्यांची चोरी, पोलिसांकडून अटक

पुण्यातील प्रोफेशनल डान्सर मौजमजेसाठी करायचा दुचाक्यांची चोरी, पोलिसांकडून अटक

या चोरांनी आतापर्यंत लाखो किमतीच्या दुचाकी चोरल्या आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 25 फेब्रुवारी : केवळ मौजमजेसाठी एक टोळी दुचाकींची चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.  पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या पथकानं या टोळीचा पर्दाफाश केला असून या टोळीत एक प्रोफेशनल डान्सर असल्याचंही समोर आलं आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल २५ दुचाकी हस्तगत केल्या असून आणखी काही गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे. संजय भोसले (20), ऋषिकेश डोंगरे (19), अभिषेक भडंगे आणि अजित कांबळे (19) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील अभिषेक भडंगे हा प्रोफेशनल डान्सर असून त्याच्या एका शॉर्टफिल्मचं कामही सुरु असल्याचं समजत आहे. हस्तगत केलेल्या गाड्यांची किंमत तब्बल १२ लाख २० हजार असून यात स्प्लेनडर, पॅशन, युनिकॉर्न आणि ऍक्टिव्हा आदी गाड्यांचा समावेश आहे. पुणे शहर आणि ग्रामीणच्या हद्दीतून आरोपींनी या गाड्या चोरल्याची माहिती समोर आली आहे. हडपसर येथील मगरपट्टा चौकात असलेल्या वाहनतळात चारजण संशयितपणे फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसाप हडपसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हे चारही तरुण गाड्यांची चाचपणी करीत असताना दिसले. या चौघांना ताब्यात घेत त्यांनी चौकशी केली. यावेळी त्या तरुणांनी आपण 25 दुचाकी चोरल्याची माहिती दिली. मौजमजा करण्यासाठी चोरी करीत असल्याचे या तरुणांनी कबूल केले. यापैकी अभिषेक अनिल भडंगे हा प्रोफेशनला डान्सर असून त्याने स्टेज शो व काही माहितीपटांमध्येही काम केल्याचे सांगितले. हेही वाचा - पुण्याचा रिअल लाईफ हिरो, स्वत:च्या जीवाची बाजी लावून रोखला भीषण अपघात धनंजय मुंडे झाले ‘शिवकन्ये’चे बाप, रेल्वे ट्रॅकवरील मुलीचं स्वीकारलं पालकत्व क्रुरतेचा कळस! मटण चोरलं म्हणून दुकानदाराने कुत्र्याच्या पाठीत घुपसला चाकू  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: #Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात