जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / भाजप खासदाराचा शरद पवार आणि अजितदादांवर निशाणा, सुप्रिया सुळेंवरही गंभीर आरोप

भाजप खासदाराचा शरद पवार आणि अजितदादांवर निशाणा, सुप्रिया सुळेंवरही गंभीर आरोप

भाजप खासदाराचा शरद पवार आणि अजितदादांवर निशाणा, सुप्रिया सुळेंवरही गंभीर आरोप

सुब्रमण्यस्वामी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यस्वामी यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाहीतर सुब्रमण्यस्वामी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले आहे. या ना त्या आरोपांमुळे ओळखलेले जाणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यस्वामी यांनी आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदावर बोट ठेवले आहे.  ‘राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चांगलेच मतभेद आहे. दोघांचेही वेगवेगळे विचार आहे. त्यामुळे या पक्षात अंतर्गत कलह आहे’ असा दावाच स्वामींनी केला आहे. सुब्रमण्यस्वामी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे.

जाहिरात

‘निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचा सिंगापूर सिटीझनशिप आणि इतर कंपनी व्यवहार सीबीआय चौकशी मागणी केली होती’, असा मुद्दा सुब्रमण्यमस्वामी यांनी उपस्थितीत केला आहे. बच्चू कडूंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीत खळबळ, अखेर कृषी मंत्र्यांनी केला खुलासा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याबद्दल  सुब्रमण्यस्वामी यांनी आपल्या टीव्टमध्ये उल्लेख केला आहे.  सुब्रमण्यस्वामी यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण पेटण्याची चिन्ह आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात