संजय राऊत यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल करावा, भाजप नेत्याची रोखठोक मागणी

kunal kamra invites sanjay raut on his podcast

'काँग्रेस पक्षाला मांडी लावून राज्य केल्यानंतर 'तुकडे गॅग'चा विचारच शिवसेनेच्या मनात येणार'

  • Share this:
मुंबई, 27 डिसेंबर: शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यावर देशद्रोह गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केंद्र सरकारकडे केली. आमदार भातखळकर यांनी संजय राऊतांनी 'बोरूबहाद्दर' असंही संबोधलं आहे. हेही वाचा...खळबळजनक! सांगलीतील आटपाटीतून 'त्या' 16 लाख रुपये बकऱ्याची चोरी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामाना' दैनिकातील रोखठोक यात संजय राऊत यांनी देशांतर्गत राज्सात फुटिरता वाढेल आणि कायदा सुव्ययवस्था निर्माण होईल, असं लिखाण केलं आहे. काँग्रेस पक्षाला मांडी लावून राज्य केल्यानंतर 'तुकडे गॅग'चा विचारच शिवसेनेच्या मनात येणार, अशी खोचक टीका आमदार भातखळकर यांनी संजय राऊतांवर केली आहे. काय म्हणाले संजय राऊत? सन 2020 वर्ष मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत' असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक लगावला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. हेही वाचा...पार्थ पवार पंढरपुरातून आमदरकीची निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले... 'हिंदुस्थान-चीनमधील तणावातून निर्माण झालेले हे संकट आहे. चीनचे सैन्य 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. 'चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आर्थिक संकटात सापडलेल्या जनरल मोटर्स कंपनीत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. आता ते होणार नाही. त्यामुळे जनरल मोटर्स बंद होईल. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता' असं परखड मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
Published by:Sandip Parolekar
First published: