मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खळबळजनक! सांगलीतील आटपाटीतून 'त्या' 16 लाख रुपये बकऱ्याची चोरी

खळबळजनक! सांगलीतील आटपाटीतून 'त्या' 16 लाख रुपये बकऱ्याची चोरी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून 16 लाख रुपयांचा बकरा (Goat) चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून 16 लाख रुपयांचा बकरा (Goat) चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून 16 लाख रुपयांचा बकरा (Goat) चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.

सांगली, 27 डिसेंबर: सांगली जिल्ह्यातील (Sangali District) आटपाडी येथून 16 लाख रुपयांचा बकरा (Goat) चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यभरात या बकऱ्याची चर्चा झाली होता. आटपाडीचे रहिवासी सोमनाथ जाधव यांनी हा बकरा तब्बल 16 लाख इतकी किंमत मोजून खरेदी केला होता. विशेष म्हणजे दीड कोटी रुपये किंमत असलेला मोदी बकरा (Modi Goat) याच्या वंशाचा हा बकरा होता. गोठ्यात बांधलेला बकरा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटे पळवला. या चोरात आलिशान कारचा वापर करण्यात आल्याचं समजते. हेही वाचा...सुशांतसिंह राजपूतप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी CBI ला केला 'हा' सवाल प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा (Modi Goat) याच्याच वंशाचा हा बकरा होता. आता हाच 16 लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दीड कोटी किमतीच्या मोदी बकऱ्याचा अंश असलेल्या सहा महिने वय असलेलं हे पिल्लू होतं. सोमनाथ जाधव यांनी ते 16 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. बकऱ्याची चोरी झाल्यानं आटपाडी शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हेही वाचा...या भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक! दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या आटपाडीला कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते. ही यात्रा खूप प्रसिद्ध असते. येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. दोन्ही राज्यांतील मेंढपाळ येथे मोठ्या संख्येनं येतात. या वर्षी मात्र कोरोनामुळे आटपाडीची कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द झाली. येथे महागडे बकरे बाजारात विक्रीसाठी येतात. त्यांची बोली ही लाखांच्या घरात असते.
First published:

पुढील बातम्या