मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पार्थ पवार पंढरपुरातून आमदरकीची निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले...

पार्थ पवार पंढरपुरातून आमदरकीची निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले...

 पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
नाशिक, 27 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांना पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार आमदरकीची निवडणूक लढवणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा..पार्थ पवार पंढरपूर पोटनिवडणूक लढवणार? जयंत पाटील म्हणाले... रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत शरद पवार साहेब, अजितदा आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली, म्हटलं म्हणून लगेच ती पूर्ण होईलच असंही होत नाही, असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं. रोहित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कळवण तालुक्यात मुक्कामी जाणार आहेत. पारंपरिक फेस्टिव्हल अनुभवायचं आहे म्हणून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मी आज आमदार म्हणून आलेलो नाही. नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील रोहित पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले, मी पदाधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या होत्या. मात्र, अनेक कार्यकर्ते इथे आले, मी सांगितलं मास्क लावा मात्र त्यांनी ऐकलं नाही. मास्क लावा, स्वत: ची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. चंद्राकांतदादांवर साधला निशाणा.. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरला सेटल होणार आहेत, याबाबत रोहित पवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, ते कोल्हापूरला जातील. पण कोल्हापुरकर त्यांचं स्वागत करतात का हे बघू, असा टोला रोहित पवार यांना यावेळी लगावला. एकनाथ खडसे EDच्या चौकशीला समोरे जातील. राजकीय पद्धतीने जर अशा संस्थेचा वापर होत असेल तर ते अयोग्य असल्याचंही रोहित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. हेही वाचा...दाऊद इब्राहिमचा पंटर भारतात येताच मुसक्या आवळल्या, 24 वर्षांपासून होता फरार पार्थ पवार यांना जर उमेदवारी देण्यात आली तर प्रशांत पारिचारक पार्थ यांना पाठिंबा देण्यासाठी रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड केली आहे. भगिरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली असती, तर लोकांच्या सहानुभुतीचा फायदा त्यांना झाला असता. पण, पोटनिवडणुकीऐवजी पुढील निवडणुकीत भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीकडून दिले असल्याचे बोलले जात आहे.
First published:

पुढील बातम्या