मुंबई, 28 मे: भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळात अनेक ठिकाणी नुकसान झालं. या चक्रीवादळाचा फटका कोकणालाही बसला. या चक्रीवादळासंबंधित राज्य सरकारनं (State Government) जाहीर केलेल्या मदतीवर दरेकर यांनी ताशेरे ओढले आहेत. मदत तुटपुंजी आहे, कोकण बद्दल आसता दिसली नाही. केवळ मदत करायची म्हणून केली आहे. अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत,असं म्हणत दरेकरांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मी मंत्रालयाच्या दारावर आंदोलन करणार होतो, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
संजय राऊत म्हणतात केंद्राने 2000 कोटींची मदत द्या म्हणाले. मग 252 कोटी राज्याने कसे ठरवले. 47 कोटींचा अहवाल दाखवला. एनडीआरएफ 72 कोटी म्हणत आहे. मग 252 कोटी कुठून आले. हे पंचनामे फसवे असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- भारताचे प्रयत्न अपयशी, मेहुल चोक्सीला 'या' देशाकडे सोपवणार
निसर्ग वादळपेक्षा जास्त नुकसान झाले असा म्हणतात. मग वाढीव दराने मदत केली कसा म्हणता?, असा सवालही दरेकरांनी राज्य सरकारला विचारला आहे. पुढे दरेकर म्हणाले, पंचनाम्यात 12-15 लाख करता आणि मदत 15 हजार देतात.
एका झाडाला दिलेली मदत खूप कमी आहे.
हेही वाचा- चंद्रपूर जिल्ह्यात 'अशी' लागू झाली होती दारुबंदी, वाचा सविस्तर
ठाकरे सरकारला कुठलीच कीव नाही. मच्छीमार बांधवांना योग्य मदत झाली नाही. घरगुती उद्योग करणाऱ्या लोकांचे खूप नुकसान झालं. त्याचा विचार केला नाही. त्यामुळे ठाकरे सरकार कसले वाढीव दर म्हणताहेत, असं दरेकरांनी परिषदेत म्हटलं.
कृषी विद्यापीठाच्या मार्फत अभ्यास केला गेला पाहिजे, असं दरेकर म्हणालेत. तसंच ही मदत तरी लोकांच्या हाती पाडवी, नाहीतर कोकणच्या आमदाराबरोबर मी थांबलेली आंदोलन पुन्हा सुरू करेन, अशा इशारा दरेकरांनी राज्य सरकारला दिला आहे. निसर्ग वादळाची मदत लोकांपर्यंत पोहोचली नाही तसं याबाबतीत होऊ नये, असंही ते म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pravin darekar, State government, Uddhav thackeray