मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मेहुल चोक्सीची रवानगी 'या' देशाकडे, शरीरावर खुणा असल्याचा वकिलांचा दावा

मेहुल चोक्सीची रवानगी 'या' देशाकडे, शरीरावर खुणा असल्याचा वकिलांचा दावा

PNB Scam: मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मेहुल चोक्सीच्या शरीरावर खुणा आढळून आल्या आहेत.

PNB Scam: मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मेहुल चोक्सीच्या शरीरावर खुणा आढळून आल्या आहेत.

PNB Scam: मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मेहुल चोक्सीच्या शरीरावर खुणा आढळून आल्या आहेत.

नवी दिल्ली, 28 मे: पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी(Mehul Choksi) ला मंगळवारी डोमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) अटक केली. सुरुवातीला डोमिनिका सरकार मेहुल चोक्सीला भारतात सोपणवार असं सांगितलं होतं. आता डोमिनिका सरकारनं आपला निर्णय बदलला आहे. मेहुल चोक्सीला पुन्हा डोमिनिकार सरकार अँटिग्वाकडे (Antigua) सोपवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे भारताचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

चोक्सीला डोमिनिका देशातून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याला आता परत अँटिग्वाकडे पाठवण्यात येणार असल्याचं डोमिनिकाच्या मिनिस्ट्री ऑफ नॅशनल सिक्युरिटी आणि होम अफेअर्सनं म्हटलं आहे.

मेहुल चोक्सीला भारतात आणता येऊ शकतं का?, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चोक्सीचे वकील विजय अगरवाल यांनी म्हटलं की, मेहुल चोक्सीनं अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलं आहे. तर भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. इमिग्रेशन आणि पासपोर्ट अॅक्टनुसार चोक्सीला केवळ अँटिग्वालाच परत पाठवता येऊ शकतं.

हेही वाचा- मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे घेणार आज मुख्यमंत्र्यांची भेट, फडणवीसांसोबतही बैठक

मेहुल चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तीन दिवसांपूर्वी तो अँटिग्वामधून गायब झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अँटिग्वामधून क्युबा येथे पसार झाल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, आता डोमिनिकाच्या सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं आहे.

मेहुल चोक्सीच्या शरीरावर खुणा

मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्याच्या वकिलानं म्हटलं आहे. तसंच चोक्सीच्या शरीरावर काही खुणा आहेत, असा दावाही त्याच्या वकिलांनी गुरुवारी केला.

विजय अगरवाल यांच्या दाव्यानुसार, गीतांजली समूहाच्या अध्यक्षांना काही लोकांनी जबरदस्ती घेऊन गेले. त्यांना अँटिग्वा येथून जहाजातून डोमिनिका येथे नेण्यात आले. अगरवाल यांनी आरोप केला की चोक्सीच्या शरीरावर ‘अत्याचाराच्या खुणा’ आहेत.

डोमिनिका येथील चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी या वृत्ताल दुजोरा दिला आहे. त्यांनी शरीरावर असलेल्या खुणांची स्पष्टता केली. चोक्सी यांचे डोळे सुजलेले आणि शरीरावर काही ठिकाणा खुणा दिसल्याचं मार्श यांनी सांगितलं.

First published:

Tags: Pnb, Pnb bank