• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : राज्य सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल

BREAKING : राज्य सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल

'इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती'

  • Share this:
मुंबई, 16 मार्च : पूजा चव्हाण मृत्यू (Pooja Chavan case) प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर कारमायकल रोड प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze Arrest) यांना झालेली अटक आणि त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही (Nitin Raut) अडचणीत आलेले आहेत. याचं कारण आहे भाजपचे (BJP) माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकीकडे राज्याची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचं चार्टर्ड विमान वापरलं (State Government Chartered Aircraft), असा आरोप पाठक यांनी केला आहे. इतकंच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते, मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीकडे केला आहे. काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेताचा पक्षाला रामराम; NCP मध्ये प्रवेश करणार मागील वर्षी ऐन कोरोनाच्या काळात राज्यापुढे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना जुलै महिन्यात राऊत यांनी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता आणि या हा सगळा प्रवास खासगी होता, यात सरकारी कामाचा कोणताही सहभाग नव्हता असाही आरोप पाठक यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. इतकंच नाही तर राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकत ही बिलं भरायला लावलीत, असा आरोपही पाठक यांनी आपल्या तक्ररीत केला आहे. या सगळ्या प्रकरणात मुळात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला आहे तसंच बेकायदेशीरपणे सरकारी कंपन्यांना आपली बिलं राहायला लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली आहे. राज्य सरकार आणि कोरोनाचे प्रेमसंबंध आहेत का? मनसे नेत्याचा अजब सवाल मुख्यमंत्र्यांनी तर या प्रकरणी राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. तसं न झाल्यास आपण मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई सुरुच ठेवू, असा इशारा सुद्धा पाठक यांनी दिला आहे.  एकीकडे वीज बिलं न भरल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज कापली जात आहे पण सरकारी पैशांचा अपव्यय करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणार का? असा सवाल पाठक यांनी विचारला आहे.
Published by:sachin Salve
First published: