मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'भाजप सर्वात मोठा खोटारडा पक्ष', ऑक्सिजन प्लांटवरून काँग्रेस आणि भाजपात जुंपली

'भाजप सर्वात मोठा खोटारडा पक्ष', ऑक्सिजन प्लांटवरून काँग्रेस आणि भाजपात जुंपली

'वस्तुस्थिती-केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही'

'वस्तुस्थिती-केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही'

'वस्तुस्थिती-केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 25 एप्रिल : राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट ओढावले आहे. रुग्णांना लवकर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीये. पण अशा परिस्थितीत भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA Goverment) मदतीवरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. भाजपने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केल्याचा दावा केला होता. तो दावा आता काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी दिला होता. पण सरकारने एकही प्लांट उभारला नाही, हे पैसे राज्य सरकारने गायब केले, असा गंभीर आरोप भाजपने केला होता.

खरेदी करून दुचाकीवरुन परतत होता नवरदेव;लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कुटुंबावर शोककळा

भाजपच्या या आरोपाला सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी उत्तर दिले आहे. 'भाजप हा जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष आहे. वस्तुस्थिती- केंद्र सरकारने 10 ऑक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही. प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारनेच ठरवली. 5 एप्रिल 2021 नंतर मशीन पुरवत आहेत. सिंधुदुर्गाला अजून दिली नाही' असा पलटवार सावंत यांनी केला.

तसंच, 'केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एजन्सीचे इंजिनिअर इन्स्टॉलेशन करत आहेत. असे असतानाही पत्रकार परिषद घेऊन खोटारडे आरोप भाजप करत आहे. देशात घोषित केलेल्या 162 ऑक्सिजन प्रकल्पांपैकी केवळ 33 झाले असे केंद्र म्हणत आहे. आता 551 नवीन जाहीर केले. ते चालू होणार केव्हा हे मोदीजीच जाणे' असा टोलाही सावंत यांनी लगावला.

'सत्तेच्या हव्यासापोटी भाजप अत्यंत खालच्या थराला गेला आहे. भाजप पक्ष जाणीवपूर्वक असे खोटे आरोप करत आहे', अशी टीकाही सावंत यांनी केली.

RSS ने इंदूरमध्ये देशातलं दुसरं सर्वात मोठं कोविड सेंटर सुरू केलं, खरं आहे का?

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. 'रेमडेसीवीर इंजेक्शन केंद्राने दिलेले आहे. त्यावर आभार मानण्याचे काम ही राज्य सरकार करत नाही. बीपीसीएल ऑक्सिजन पुरवठा अखंडित करून देण्साचे मान्य केले असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्स सरकारला मदत जाहीर केली. निदान आता तरी विश्वासाचे वातावरण राज्य सराकरने करावे', अशी टीका दरेकर यांनी केली होती.

'राज्य सरकारला खुले चॅलेंज आहे लस उपलब्ध आहे तरी ही लस केंद्र बंद असल्याचे सांगत आहे. विनाकरण दुर्दैव राजकारण केले जात आहे, काही लस वाया घालवले नेमके कोणाला लस दिली', असा आरोपच दरेकर यांनी केला आहे.

First published:

Tags: BJP, Congress