इंदूर, 25 एप्रिल : इंदूरमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी (Corona Infection) येेथे देशातील दुसरं सर्वात मोठं कोविड केअर सेंटर (country second largest covid care center) तयार झालं आहे. हे कोविड सेंटर खंडवा रोडवर राधास्वामी सत्संग भवनावर अहिल्या कोविड केअर सेंटर (Ma Ahilya covid care center) म्हणून तयार करण्यात आलं आहे. येथे 6 हजार खाटांची क्षमता असून सध्या 600 खाटांसह कोविड सेंटर सुरू झालं आहे. या सेंटरवर रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी चार मोठ्या रुग्णालयांना सोपवण्यात आली आहे. या कोविड सेंटरचा खर्च स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हा खर्च केल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. मात्र काय आहे सत्य? देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था असून जेवणाव्यतिरिक्त गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था आहे. इंदूरमध्ये राहणाऱ्यांना या सेंटरमध्ये भरती करून घेण्यात येणार आहे. हे सेंटर इंदूरच्या स्थानिक प्रशासनामार्फत चालविण्यात येत आहे. यासंदर्भातील एक प्रेस नोटही काढण्यात आली होती. हे ही वाचा- सावधान, घराबाहेर फिरण्याचा विचार करताय? आधी हा VIDEO पाहा, पोलीस काय करतायेत हाल
Second Largest #COVID19 Care Center in India.
— Harshavardhan Muppavarapu (@vardhan08) April 24, 2021
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has built a 6000-bed covid care center and 4 oxygen plants in 45 acres of land in Indore. Kudos to their efforts. pic.twitter.com/yOiCnPSmJl
मात्र हे सेंटर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असल्याचं वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक मोठमोठ्या व्यक्तींनीही अशा स्वरुपाचं ट्वीट केलं आहे. सेंटरचे प्रभारी मंत्री तुलसी सिलावट यांना करण्यात आलं आहे. विविध स्तरावर सरकारी अधिकारी ड्यूटीवर तैनात राहतील. येथील सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी RSS चे कार्यकर्ता राहणार आहेत.