मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"भाजपचं हिंदुत्व म्हणजे 'चोरबाजार'; देश विकलात पण अयोध्या विकता येणार नाही, कारण शिवसेनेच्या हाती हिंदुत्वाचा भगवा झेंडा"

"भाजपचं हिंदुत्व म्हणजे 'चोरबाजार'; देश विकलात पण अयोध्या विकता येणार नाही, कारण शिवसेनेच्या हाती हिंदुत्वाचा भगवा झेंडा"

Shiv Sena takes dig on BJP: शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली आहे.

Shiv Sena takes dig on BJP: शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली आहे.

Shiv Sena takes dig on BJP: शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 23 डिसेंबर : शिवसेनेने (Shiv Sena) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सामनाच्या संपादकीयमधून (shiv sena mouthpiece saamana) शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. "अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोधेयतच उघडायला हवे नंतर मथुरा आहेच. 'राम नाम सत्य है' हे इतरांसाठी. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे" असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

देश विकलात पण, अयोध्या विकता येणार नाही

सामनाच्या संपादकीयमध्ये पुढे म्हटलं, "लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत! देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे."

वाचा : 'आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार'

वैध-अवैध मार्गाने जिमिनी खरेदी

"भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा 'चोरबाजारा' आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अय़ोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. ह व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत." असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

लाखांची जमीन 5-10 मिनिटांत 16 कोटींची

अग्रलेखात पुढे म्हटलं, मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल आणि आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण आणि खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे. व्यवहार कसा झाला ते पाहा. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला 16 कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे.

वाचा : पहिला दिवस गाजवला, आता पुढे काय? रणनीती आखण्यासाठी भाजपची मुंबईत डिनर डिप्लोमेसी

या मंडळींनी प्रभू श्रीरामासही सोडले नाही

अग्रलेखात पुढे म्हटलं, महापौर श्री उपाध्याय हे भाजपचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वापासून कशी फारकत घेतली वगैरे प्रवचने भाजपचे पुढारी झोडत असतत, पण भाजपचे हे 'व्यापारी' हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो. व्यवहार आणि व्यापारातून या मंडळींनी प्रभू श्रीरामासही सोडले नाही.

First published:

Tags: Ayodhya, BJP, Ram Mandir, Shiv sena