मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहिला दिवस गाजवला, आता पुढे काय? रणनीती आखण्यासाठी भाजपची मुंबईत डिनर डिप्लोमेसी

पहिला दिवस गाजवला, आता पुढे काय? रणनीती आखण्यासाठी भाजपची मुंबईत डिनर डिप्लोमेसी

हिवाळी अधिवेशनात रणनीती आखण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना आज जेवणाचं खास आमंत्रण दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनात रणनीती आखण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना आज जेवणाचं खास आमंत्रण दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनात रणनीती आखण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना आज जेवणाचं खास आमंत्रण दिलं आहे.

मुंबई, 22 डिसेंबर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस प्रचंड वादळी ठरला. विशेष म्हणजे या हिवाळी अधिवेशनात पुढील रणनीती आखणण्यासाठी भाजपकडून जय्यत तयार करण्यात येत आहे. भाजपने आज मुंबईत आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर सर्व आमदारांची भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपच्या या डिनर डिप्लोमेसीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. अधिवेशनात भाजप नेते आता काय-काय विषयांवर कोणती भूमिका मांडतात ते येत्या काळात स्पष्ट होईलच. पण भाजपची ही बैठक सर्वात महत्त्वाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला प्रसारमाध्यमांच्या एकही प्रतिनिधीला परवानगी नव्हती. त्यामुळे काहीतरी गुपित रणनीती ठरत असल्याची चर्चा आहे.

हिवाळी अधिवेशनात रणनीती आखण्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना आज बैठक आणि जेवणाचं खास आमंत्रण दिलं आहे. कुलब्यातील महिला विकास मंडळ सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीनंतर सर्व आमदारांचा एकत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या डिनर डिप्लोमेसीला अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : चाळीसगावात गावगुंडांचा हैदोस, तरुणाच्या डोक्यात फरशी घातली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या या डिनर डिप्लोमेसीत अनेक महत्वाच्या विषयांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आमदारांना मार्गदर्शन करतील. याच बैठकीसाठी, विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत, महाविकास आघाडीला धोबीपछाड मारुन विजयी झालेले चंद्रशेखर बावनकुळेही दाखल झालेत. त्यांनी तर सरकार कोणकोणत्या आघाड्यांवर अपयशी ठरलेय, याचा तर अक्षरशः पाढाच वाचल्याची माहिती आहे.

सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलंय, असा आरोप करीत पेपरफुटी प्रकरणात जरी काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असली तरी याचा बोलविता धनी कोणी वेगळाच असल्याचा आरोप करीत त्यांना अधिवेशनात उघडं करणार, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याआधी केलाय. तर या प्रकरणात अनेक धक्कादायक पुरावे उघड करणार असून याची पाळंमुळं थेट मंत्रालयात पोचत असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केलाय. त्यामुळे या प्रकरणावरुन आमदारांना काही मार्गदर्शन करण्यात आल्याची शक्यता आहे. एकंदरित 12 आमदार जरी निलंबित असले तरी अधिवेशनातील इतर दिवसात, आक्रमक रणनीती आखण्याचे संकेत या बैठकीतून मिळतायत.

First published: