Home /News /mumbai /

पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

पंतप्रधान मोदी स्टॅन स्वामींना स्वप्नात तरी घाबरले असतील का? चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

'संजय राऊत हे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात'

    मुंबई, 12 जुलै : एल्गार परिषद प्रकरणातील संशयित आरोपी स्टॅन स्वामी (Father Stan Swamy case) यांच्या मृत्यूवरून भाजप (bjp) आणि शिवसेनेत (shivsena) आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावाई शोध  लावला' अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (chitra wagh) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी स्टॅन स्वामी यांच्या मृत्यू प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या लेखाला चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून टीका केला आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे फादर स्टॅन स्वामी जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात' असा टोला वाघ यांनी लगावला. VIDEO: नवरी-नवरदेव जोमात अन् वऱ्हाडी कोमात; मंडपातच नवविवाहित कपलचा रोमँटिक मूड 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्यासाठी दैनिक सामना सुरू करण्यात आले. पण, त्यांच्या विचारांना बगल देत संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपींना राऊत आपल्या लेखणीतून बळ देत आहे' असा आरोपच वाघ यांनी केला. Euro Cup 2020 : 'चक दे इंडिया' सारखीच आहे इंग्लंडच्या कोचची गोष्ट, शेवट मात्र... 'स्टॅन स्वामी यांची तुलना जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी तुलना केली. ज्या प्रकारे इंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या तसंच पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावाई शोध राऊत यांनी लावला. नक्षलवाद्यांना चिनी ड्रॅगन रसद पुरवत असतात पण मोदी त्यांना घाबरत नाही, मग यांना स्वप्नात सुद्धा घाबरतील का? समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध करणे याला घाबरणे कसं म्हणणार, असा सवाल ही वाघ यांनी राऊत यांना विचारला. काय म्हणाले होते राऊत? मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या