Home /News /sport /

Euro Cup 2020 Final : 'चक दे इंडिया' सारखीच आहे इंग्लंडच्या कोचची गोष्ट, शेवट मात्र...

Euro Cup 2020 Final : 'चक दे इंडिया' सारखीच आहे इंग्लंडच्या कोचची गोष्ट, शेवट मात्र...

चक दे! इंडिया (Chak de! India) या सिनेमासारखीच इंग्लंडचे फुटबॉल कोच साऊथगेटची (Southgate) गोष्ट आहे.

    लंडन, 12 जुलै :  भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात  1982 साली झालेल्या एशियन गेम्सच्या फायनलमध्ये भारताचा 1-7 असा मोठा पराभव झाला होता. या पराभवानंतर भारताचे गोल किपर मिर रंजन नेगी (Mir Ranjan Negi) हे व्हिलन ठरले होते. त्यांना अनेक वर्ष याचा त्रास सहन करावा लागला. नेगी यांनी या पराभवानंतरही हार न मानता पुन्हा एकदा भारतीय हॉकीमध्ये कमबॅक केले.  भारताने 1998 साली एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्या टीमचे ते गोलकिपर कोच होते. त्यानंतर चार वर्षांनी भारतीय महिलांनी 2002 साली कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल जिंकले. त्या टीमलाही नेगी यांचे मार्गदर्शन होते. नेगी यांच्या आयुष्यावर आधारित 'चक दे! इंडिया' (Chak de! India) हा सिनेमा सुपरहिट झाला. शाहरुख खानने त्या सिनेमात मुख्य भूमिका केली होती. त्यामुळे नेगी यांचा संघर्ष देशासमोर आला. चक दे इंडिया या सिनेमासारखीच इंग्लंडचे फुटबॉल कोच साऊथगेटची (Southgate) गोष्ट आहे. काय आहे साऊथगेटची गोष्ट? इंग्लंड विरुद्ध इटली (England vs Italy) यांच्यात ज्या वेम्बली स्टेडियममध्ये युरो कपची फायनल (UEFA EURO 2020 Final) झाली.  त्याच मैदानात 1996 साली इंग्लंड विरुद्ध जर्मनी (England vs Germany Euro Cup Semi Final 1996) झाली होती. इंग्लंड-जर्मनीची सेमी फायनलचा देखील निर्धारित वेळेत निकाल लागला नाही. त्यामुळे पेनल्टीशूटआऊटमध्ये या मॅचचा निर्णय लागला. इंग्लंडचे सध्याचे कोच साऊथगेटनं पेनल्टीवर गोल करण्याची संधी दवडल्यानं जर्मनीने इंग्लंडचा 6-5 असा पराभव केला. त्या पराभवानंतर साऊथगेट इंग्लंडचा व्हिलन ठरला होता. 25 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश यंदाच्या युरो कप स्पर्धेत साऊथगेट इंग्लंडचे कोच होते. ते कोच झाल्यापासूनच विशेषत: या संपूर्ण स्पर्धेत 1996च्या युरो कपची आठवण वारंवार निघाली. साऊथगेटच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडनं जोरदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया आणि चेक रिपब्लिकचा पराभव केला. तर स्कॉटलंड विरुद्धची मॅच बरोबरीत सोडवली. त्यानंतर जर्मनीचा पराभव करत साऊथगेटनं 96 चा हिशेब चुकता केला. जर्मनीनंतर इंग्लंडनं युक्रेन आणि डेन्मार्कला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. Euro Cup 2020 Final: इंग्लंडच्या फुटबॉल कोचचा 'धोनी' होण्याचा प्रयत्न फसला फायनलमध्ये गोष्ट बदलली इटली विरुद्धच्या फायनलपर्यंत साऊथगेटचा प्रवास हा 'चक दे इंडिया' सारखा होता. अगदी ही फायनल देखील पेनल्टीशूट आऊट पर्यंत गेली. यावेळी मात्र शेवट फिल्मी झाला नाही. 19 वर्षांच्या  बुकायो साकाला (Bukayo Saka) शेवटची पेनल्टी देण्याचा साऊथगेटचा प्रयत्न अंगाशी आला. त्यामुळे इंग्लंडचे आणि साऊथगेटचेही विजेतेपदाचे स्वप्नभंग झाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, Euro 2021, Football, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या