उद्यापासून 2 दिवसीय हिवाळी अधिवेशन, राज्य सरकारच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार

उद्यापासून 2 दिवसीय हिवाळी अधिवेशन, राज्य सरकारच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार

राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरवण्यात येणार आहे. सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

  मुंबई, 3 डिसेंबर: राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (winter session of the Legislature) यंदा नागपूरऐवजी (Nagpur) मुंबईत (Mumbai)  होत आहे. दोनच दिवस हे अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरवण्यात येणार आहे. सोमवारपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले आहे.

कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार

परंतु, सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.  कोरोना  परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे.

राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना विशेषत: ओला दुष्काळाचा फटका बसलेल्यांना मदत न मिळणं अशा विषयांमुळे भाजपने बहिष्कार टाकला आहे.

दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

WhatsApp वर आधीच मेसेज करा Schedule, सेट केलेल्या वेळेला आपोआप होणार सेंड

दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. मात्र, नागपुरातील आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. तसंच कोरोना काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणं शक्य नसल्यानं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या