जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार

कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार

कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार

5 Genes असलेल्या Corona patient ची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे आणि त्यांचा मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 13 डिसेंबर : गेलं वर्षभर जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूशी (Corona Virus) दोन हात करण्यासाठी शास्त्रज्ञ (Scientists) युद्धपातळीवर कार्यरत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लसी (Vaccines) विकसित केल्या जात आहेत. काही ठिकाणी लशींच्या चाचण्या घेतल्या जात आहेत, तर ब्रिटनसारख्या काही देशांमध्ये नागरिकांना लसीकरणाची सुरुवातही झाली आहे. लसीव्यतिरिक्त कोरोना विषाणूशी निगडित असलेल्या अन्य बाबींवरही शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. ब्रिटनमधल्या एडिंबरा विद्यापीठातल्या (Edinburgh University) संशोधनातून एक नवी गोष्ट समोर आली आहे. पाच विशिष्ट प्रकारची जनुकं (जीन्स - Genes) असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूपासून सर्वांत जास्त धोका आहे, असा निष्कर्ष त्या संशोधनातून निघाला आहे. ‘डेली मेल’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या संशोधनादरम्यान असं निरीक्षण नोंदवण्यात आलं, की हे पाच जीन्स असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाचं स्वरूप गंभीर होण्याचा किंवा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. TYK2, CCR2, OAS1, IFNAR2 आणि DPP9 अशी या जीन्सची नावं आहेत. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी ब्रिटनमधल्या 208 अतिदक्षता केंद्रामधल्या (ICU) 2700 कोरोना रुग्णांच्या डीएनएच्या माहितीचं विश्लेषण केलं. तसंच, या रुग्णांच्या माहितीची तुलना ब्रिटनमधल्या (Britain) आणखी एक लाख लोकांच्या माहितीसोबत केली गेली. या संशोधकांनी ज्या 2700 रुग्णांचा अभ्यास केला, त्यापैकी 22 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर 74 टक्के रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना व्हेंटिलेटर लावावा लागला. हे वाचा -  थंडा थंडा कूल ‘स्कूल’: या देशात -50 डिग्री सेल्सियस तापमानातही विद्यार्थी जातात शाळेत शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, TYK2 आणि DPP9 ही जीन्स 19 क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतात. IFNAR2 हे जीन 21 क्रमांकाच्या गुणसूत्रावर आढळतं, तर CCR2 जीन चौथ्या गुणसूत्रावर असतं. काही व्यक्ती कोरोनामुळे गंभीर आजारी पडतात, तर काही व्यक्तींना कोरोनाची लागण होऊनही फारसा त्रास होत नाही. असं घडण्यामागची कारणमीमांसा कळण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा -  डिसेंबरमध्येच मिळेल परवानगी, जानेवारीपासून कोरोना लशीकरण; पुणेरी लशीबाबत पूनावाला यांनी दिली खूशखबर कोरोनाचा सर्वांत जास्त परिणाम होणारी जीन्स शोधल्यामुळे शास्त्रज्ञांना कोरोनावरील उपचारांसाठी औषध विकसित करण्यासाठीही मदत होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचाही काही वेगळ्या पद्धतीने वापर करणं शक्य असल्यास त्याचीही चाचपणी करणं शक्य होणार आहे. विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती आणि फुप्फुसांना होणारा दाह या दोन गोष्टींशी या जनुकांचा संबंध असल्याचं शास्त्रज्ञांनी संशोधनात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात