जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर आधीच मेसेज करा Schedule, सेट केलेल्या वेळेला आपोआप होणार सेंड

WhatsApp वर आधीच मेसेज करा Schedule, सेट केलेल्या वेळेला आपोआप होणार सेंड

WhatsApp Multi device support : व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अनेक डिवाईसवर वापरू शकता. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये दिसलं होतं. याचं स्टेबल व्हर्जन अद्याप मार्केटमध्ये आलेलं नाही.

WhatsApp Multi device support : व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप अनेक डिवाईसवर वापरू शकता. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये दिसलं होतं. याचं स्टेबल व्हर्जन अद्याप मार्केटमध्ये आलेलं नाही.

अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील आपण व्हॉट्सॲपवरून मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : मेसेजिंग फ्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर(Whatsapp) नव्याने विविध फीचर्स येत असतात. यामध्ये कंपनी युजर्सचा विचार करून त्यांना उपयोगी पडतील असे फीचर्स(features) आणत असते. काही फीचर्सची युजर्सला चॅटिंग(chatting) करताना मदत होत आहे तर काही फीचर्सची मदत युजर्सला दुसऱ्यांना फोटो पाठवण्यासाठी किंवा व्हिडीओ पाठवण्यासाठी होते. विविध प्रकारचे स्टिकर्स(stickers) देखील आपल्या युजर्ससाठी कंपनी उपलब्ध करून देत असते. अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील आपण यावरून मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवत असतो. परंतु आपल्या व्यस्त कामांमुळे कधी हे शक्य होत नाही. परंतु यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार असून यामुळे तुम्ही वेळेच्या आधीच मेसेज सेट करून ठेवू शकता. यासाठी वाढदिवसाच्या(Birthday) शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहण्याची गरज नसून हे टेन्शन राहणार नाही. या सोप्या पद्धतीमुळे तुम्ही यातून सुटका करून घेऊ शकता. कंपनीने सध्या यासाठी कोणतेही फीचर उपलब्ध करून दिले नसून थर्ड पार्टी ॲप च्या मदतीने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच भन्नाट ॲपबद्दल सांगणार असून SKEDit याच्या मदतीने तुम्ही हवे तेव्हा कुणालाही मेसेज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला सतत मोबाईल हातात घेऊन बसायची गरज नाही. अँड्रॉइड फोनमध्ये या पद्धतीने करा मॅसेज शेड्युल 1)सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला थर्ड पार्टी ॲप SKEDit डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर त्यामध्ये साइन इन करा. 2) Login केल्यानंतर मेन मेन्यूमध्ये दिलेल्या WhatsApp पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ॲप काही गोष्टींसाठी परमिशन मागेल. 3) त्यानंतर Enable Accessibilityवर क्लिक करून Use service वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा SKEDit वर जाऊन toggle ऑन करायचे आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज शेड्युल करायचा आहे त्याचं नाव टाकायचं आहे. 4) त्यानंतर मेसेज टाईप करून वेळ आणि तारीख सेव्ह करा. यामध्ये तुम्ही रिपीट या पर्यायाचा वापर करून अनेकवेळा मेसेज पाठवू शकता. 5) यानंतर खाली toggle वर तुम्हाला Ask Me Before Sending हा पर्याय दिसेल. हा पर्याय तुम्ही चालू किंवा बंद करू शकता. 6) यानंतर तुम्ही सेट केलेल्या वेळी आपोआप मेसेज त्या व्यक्तीला जाईल. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही Ask Me Before Sending हा पर्याय सुरु ठेवला असेल तर मेसेज पाठ्वण्याआधी तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. परंतु तुम्ही हा पर्याय बंद ठेवला असेल तर डायरेक्ट ज्याला मेसेज पाठवायचा आहे त्याला तो पाठवला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात