उल्हासनगर 23 सप्टेंबर: राज्य सरकारने उल्हासनगर महापालिकेला दिलेल्या 8 रुग्णवाहिका आणि 1 कार्डिअॅक रुग्णवाहिका गेल्या महिन्याभरापासून धूळखात पडल्या आहेत. शिवसेना मंत्री आणि नेत्यांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी या रुग्णवाहिका वापराविना पडून आहेत, मात्र त्यांना वेळच नसल्याचा आरोप भाजपने केला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 कार्यालयाच्या आवारात या सगळ्या रुग्णवाहिका उभ्या आहेत. या रुग्णवाहिके समोर नारळ फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णवाहिकेचा प्रतिकात्मक लोकार्पण सोहळा पार पाडला आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शिवसेनेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
भाजप हे स्टंट युतीत असतांना शिवसेनेकडून शिकली, पूर्वी हे स्टंट शिवसेना करत होती असे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच रुग्णवाहिका चालवण्यासाठी चालक नसल्याने त्या उभ्या आहेत. दरम्यान खाजगी पध्दतीने चालक घेण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू असून दोन दिवसात रुग्णांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका हजर होतील असे शिवसेने स्पष्ट केलं आहे.
मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस मंत्र्याची भूमिका
शहरात आतापर्यंत 275 जणांचे कोरोनाने मृत्यू झालेत तर 8 हजार 700 कोरोना रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णवाहिका लवकरात लवकर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, देशात महाराष्ट्रात आणि राज्यात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत तर कोरोनाचा उद्रेक झालाय त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अशी गंभीर परिस्थिती असतांना मुंबई महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रजा फाऊंडेशनने या संदर्भात श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली असून त्यात ही माहिती उघड झाली आहे.
2019 मध्ये महापालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 टक्के पदं तर पॅरा मेडिकलची 43 टक्के पदं रिकामी होती. तर 2018-19मध्ये आरोग्यवरचं 54 टक्के बजेट वापरलच गेलं नाही अशीही माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांनो सावध राहा, हवामान विभागाने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
तर 2018 च्या आकडेवारीनुसार रोज 28 लोकांचा कॅन्सरने, 29 लोकांचा मधुमेहाने तर 22 जणांचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू होत असल्याचं आढळून आलं आहे.या आजारांसाठी पालिकेमध्ये ठोस धोरणाचा अभाव असल्याचंही उघड झालं आहे. 2019-20 मध्ये 54टक्के मुलं जन्मतः ऍनेमिक होती असंही आढळून आलं आहे.