मुंबई 23 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता काही मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थेट मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन करत 52 टक्के असलेल्या OBC समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्या असं म्हटलेलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला ईडब्लूएस कोट्याचून आरक्षण देण्याचा निर्णय झाला. गरीब समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय झाला पण 52 टक्के ओबीसींसाठी या विषयाची चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही असंही त्यांनी ठासून सांगितले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ओबीसी समाज नाराज होता कामा नये, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा असंही ते म्हणाले.
ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळ यांना निधी मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचवेळी ओबीसींवर अन्याय नको इतकीच आमची मागणी आहे.
BREAKING: 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद! मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा
मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण शक्य नाही. आमची आग्रही मागणी ओबीसी कोट्यातून आरक्षण नको एवढीच आहे. मंत्रिमंडळातले विषय बाहेर बोलायचे नाहीत पण ओबीसी विषय कायमच मांडत आलो आहे असंही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडलाच्या झालेल्या बैठकीतही छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले?
मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात अडकल्याने राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मुद्यांवर मंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते विरुद्ध OBC नेते असे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हा विषय संवेदनशील असल्याने आणि दोनही समाजाची संख्या ही मोठा असल्याने सरकारला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल असं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलं आहे.
रचला इतिहास! या महिलेला मिळाला राफेलचा पहिल्या फायटर पायटल होण्याचा मान
मराठा समाज, विद्यार्थी आणि तरुणांना आर्थिक मदत देताना ओबीसी आणि धनगर समाजातील लोकांचा त्यांचा विसर पडू देऊ नका अशी भूमिका काही कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली होती.
राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वड्डेटीवार या मंत्र्यांनी ओबीसी समाज महामंडळासाठी ‘सारथी’च्या धर्तीवर आर्थिक पॅकेजच्या मदतीची मागणी केली.