Home /News /mumbai /

मोठी बातमी : राज्य निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचा आक्षेप फेटाळला, मात्र मतमोजणी कधी?

मोठी बातमी : राज्य निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचा आक्षेप फेटाळला, मात्र मतमोजणी कधी?

काँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

काँग्रेसने (congress) भाजपच्या दोन आमदारांवर (bjp mla) आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता

    MLC Election UPDATES : मुंबई, 20 जून : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप (BJP MLAs Mukta Tilak and Laxman Jagtap) यांच्या मतदानावर (MLC Election) काँग्रेसने आक्षेप घेतला होता. याबाबर राज्य निवडणूक आयोगाकडे (Election commission) तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान आयोगाच्या बैठकीनंतर मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून काँग्रेसचा (The State Election Commission rejected the Congress' objection) आक्षेप फेटाळण्यात आला आहे. दरम्यान केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतरच मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता. गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत हे दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीमध्ये टाकले आहे. त्यानंतर मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी सही सुद्धा केली. जर दोन्ही आमदारांनी सही केली असेल तर मतपत्रिका ही दुसऱ्या व्यक्तीने का टाकली, असा आक्षेप काँग्रेसने घेतला होता. यानंतर काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान आयोगाच्या बैठकीनंतर काँग्रेसचा आक्षेप फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतरच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Election commission, Mla, Mumbai, NCP, Young Congress

    पुढील बातम्या