मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी! कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील SEBI चे मुख्यालय बंद

मोठी बातमी! कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील SEBI चे मुख्यालय बंद

एक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळल्यामुळे शेअर बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India)चे मुख्यालय 10 मे पर्यंत बंद राहणार आहे.

एक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळल्यामुळे शेअर बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India)चे मुख्यालय 10 मे पर्यंत बंद राहणार आहे.

एक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळल्यामुळे शेअर बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India)चे मुख्यालय 10 मे पर्यंत बंद राहणार आहे.

मुंबई, 08 मे : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI मध्ये (Securities and Exchange Board of India) कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सेबीचे मुख्यालय 10 मे पर्यंत बंद राहणार आहे. सेबीमध्ये मॅनेजर पदावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला आहे. मीडिया अहवालानुसार सेबीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचा आणि घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह मॅनेजरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची सेबीकडून चौकशी करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

सेबीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले आहे की, लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सेबीकडून अत्यावश्यक असणाऱ्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. गुरूवारी संध्याकाळी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 'सेबी'ने आवश्यक पावलं उचलत त्यांच्या मुंबई स्थित वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कार्यालयाला सॅनिटाइझ केले आहे.

(हे वाचा-स्वस्त औषधं आणि व्हॉट्सअ‍ॅप-ईमेलवरून ऑर्डर, लॉकडाऊनध्ये मोदी सरकारची विशेष योजना)

लॉकडाऊनमध्ये सेबीने स्टॉक मार्केट ट्रेडिंग घरून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याआधी गुरूवारी शेअर बाजार नियामक असणाऱ्या सेबीने फ्रँकलिन टेंपलटन म्युच्यूअल फंडला निर्देश दिले होते की, त्यांनी लवकरात लवकर गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, ज्यांनी त्यांच्या बंद होणाऱ्या सहा डेट योजनांमध्ये गुंतवणूक केली होती. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांनी 30 कोटी गुंतवले आहेत.

अन्य बातम्या

कोट्यवधी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 6 हजार रुपये, असं तपासा या यादीत तुमचं नाव

रिलायन्स जिओची तिसरी सगळ्यात मोठी डील

देशात मीठाचा पुरवठा कमी होणार? लॉकडाऊनमुळे उत्पादन घटलं

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: Coronavirus, Sebi