Home /News /money /

रिलायन्स जिओची तिसरी सगळ्यात मोठी डील, अमेरिकेची Vista Equity कंपनी करणार 1,367 कोटींची गुंतवणूक

रिलायन्स जिओची तिसरी सगळ्यात मोठी डील, अमेरिकेची Vista Equity कंपनी करणार 1,367 कोटींची गुंतवणूक

रिलायन्स जिओमधील ही तिसरी हाय प्रोफाइल गुंतवणूक आहे.

    नवी दिल्ली, 08 मे : अमेरिकेतील व्हिस्टा इक्विटी पार्टनर (Vista Equity Partners) कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार आहे. व्हिस्टा कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा 2.3 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने आज याची घोषणा केली. ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मच्या 4.91 लाख कोटींच्या किंमतीवर असेल आणि एंटरप्राइझ मूल्य आता 5.16 लाख कोटी असेल. यूएस-आधारित प्रायव्हेट इक्विटी फर्म व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स ही जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान केंद्रित फंड करणारी कंपनी आहे. रिलायन्समध्ये तिसरी मोठी गुंतवणूक रिलायन्स जिओमधील ही तिसरी हाय प्रोफाइल गुंतवणूक आहे. जिओमध्ये फेसबुकने 9 .9 टक्के भागीदारीसाठी 43 हजार 534 कोटी रुपयांची आणि सिल्व्हर लेकने 1.5% भागीदारीसाठी 5655 कोटींची गुंतवणूक केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जिओ मधील सिल्व्हर लेकची गुंतवणूकही फेसबुक डीलप्रमाणेच प्रीमियमवर होती. तीन आठवड्यांत जिओ प्लॅटफॉर्मने तंत्रज्ञान गुंतवणूकदारांकडून 60 हजार 596.37 कोटी रुपये जमा केले आहेत. 2016 मध्ये जिओची सुरूवात झाली होती 2016 मध्ये जिओची सुरुवात झाली. हळूहळू जिओने दूरसंचार उद्योगात आपलं स्थान मिळवलं. टेलिकॉम आणि ब्रॉडबँडपासून ते ई-कॉमर्सपर्यंत जिओनं विस्तार केला आणि 38 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचले. भारतात फेसबुकचे 400 लाख युझर आहेत. पीडब्ल्यूसी कन्सल्टन्सीनुसार 2022मध्ये भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 850 दशलक्ष होण्याची शक्यता आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या