वसई, 05 डिसेंबर : 'महराष्ट्रातील काही गाव कर्नाटकात चालली आहेत. काही गाव गुजरातेत चालली आहेत. त्यांना दाखवायचे आहे. कर्नाटक ,गुजरातमध्ये राज्य भाजपचं आहे, तिकडे खूप मोठा विकास झाला आणि महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हे गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच षड्यंत्र आहे' अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे
कांदिवली येथील मालवणी महोत्सवात सिंधुदुर्गातील आरवलीच्या वेतोबाचे दर्शन घेवून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी राज ठाकरे, राधाकृष्ण विखेपाटील यांना खडेबोल सुनावले.
भाजप महाराष्ट्राचे लचके तोडायचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची भाजपमध्ये स्पर्धा चालली आहे. मुंबई काबीज करण्याच भाजपचं जुनं स्वप्न आहे. महराष्ट्रातील काही गाव कर्नाटकात चालली आहेत. काही गाव गुजरातेत चालली आहेत. त्यांना दाखवायचे आहे. कर्नाटक ,गुजरातमध्ये राज्य भाजपच आहे, तिकडे खूप मोठा विकास झालाय आणि महाराष्ट्राचा विकास झाला नाही. हे गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठीच षड्यंत्र आहे. मराठी माणसासाठीच नाही तर मुंबई महराष्ट्रात ठेवायची की नाही याच्यासाठी हातवर करा, असे भास्कर जाधव यांनी आवाहन केलं.
(Video : आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? नव्या वक्तव्याने वाद चिघळला)
'भाजप उत्सव मोठ्या दिमाखात साजरे करून शिवसेनेचे उत्सव साधेपणाने होतायत हे दाखवत आहे. त्यांच्या मागे बिल्डर व्यापारी, केंद्रीय सत्ता उभी आहे. भाजपने कितीही भेटवस्तू वाटल्या कितीही प्रलोभने दिली तरी मराठी माणूस विकला जाणार नसल्याचा घणाघात जाधव यांनी केला.
तसंच, आता जर मुंबई आपल्या हातातून गेली तर ती कधीच मिळणार नाही. तेव्हा मुंबई हातची जाऊ देवू नका' असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.
(निवडणूक कधीही घेतली तरी...; केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात)
'दंगलीमध्ये कोण गुजराती कोण मारवाडी पहिले नाही तर तो आपला आहे म्हणून त्याचं संरक्षण शिवसैनिकांनी केलं. मला गुजराती,मारवाडी ,उत्तरभारतीय,नॉन महाराष्ट्रीयन माणसाला प्रश्न विचारायचा आहे. १९९२-९३ साली मुंबईमध्ये दंगल झाली सर्वात जास्त आरोपी आणि जास्त त्रास जो झाला असेल तो शिवसैनिकांना. मराठी माणूस म्हणजे फक्त नोकरी करणारा मला सर्व नॉन महाराष्ट्रीयन लोकांना विचारायचं जर त्यावेळी शिवसैनिकांनी मराठी माणसांनी दंगलीत गुजराती मारवाडी नॉन महाराष्ट्रीयन असा भेदभाव केला असता तर आज परिस्थिती वेगळी असती, असंही जाधव म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news