मुंबई 4 नोव्हेंबर : शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. सत्ता गेल्यानंतर आज दारोदारी फिरत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साधे भेटत देखील नव्हते असा हल्लाबोल केसरकर यांनी केला आहे. दरम्यान ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्यानं शिंदे गटावर आरोप करण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिलं जाईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
निवडणूक आम्हीच जिंकणार
त्यांनी यावेळी निवडणुकांवरही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक कधी घ्यायची याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेत असतं. निवडणूक कधीही घेतली तरी त्याला सामोरे जाण्याची भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीची तयारी आहे. निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : LLB च्या परीक्षेसाठी राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यालाच दांडी; कोण आहे हा मनसे नेता?
राजन साळवी, नाईकांवर प्रतिक्रिया
दरम्यान त्यांनी यावेळी राजन साळवी आणि वैभव नाईक यांना आलेल्या एसीबीच्या नोटीसीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. तक्रारीनुसार एसीबीची नोटीस येत असते. या नोटीसीला सामोरे जाऊन समर्पक उत्तरे दिली तर संबंधित व्यक्तीवर कोणतीच कारवाई होत नाही. आणि ज्याच्याविरोधात तक्रार आहेत, त्यांना उत्तरे द्यावीच लागतात असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता दीपक केसरकर यांच्या टीकेला ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.