मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? नव्या वक्तव्याने वाद चिघळला

Video : आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? नव्या वक्तव्याने वाद चिघळला

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Ajay Deshpande

औरंगाबाद, 4 डिसेंबर : भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून  मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील आज छत्रपती शिवाजी महाराज  यांचा जन्म कोकणात झाल्याचे म्हणत या वादात भर घातली. यानंतर भाजपाचे आणखी एक नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

शिवरायांचा एकेरी उल्लेख  

रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यनंतर दानवे यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे. शिवप्रेमी नागरिकांकडून दानवेंचा निषेध करण्यात येत आहे.

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक  

शिवरायांचा जन्म हा कोकणात झाला असं वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचर घेतला आहे. विरोधकच नाही तर शिंदे गटाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. मंत्रिपद गेलं खड्ड्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

First published: