Home /News /mumbai /

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले?

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले?

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आक्षेप घेतला. यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांना तातडीने सडेतोड उत्तर दिलं.

    मुंबई, 3 जुलै : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची आज निवड झाली. राहुल नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात अनेक नेत्यांना एकमेकांना चिमटे काढले. मात्र यादरम्यान शहरांच्या नामांतरचा मुद्दाही गाजला. महाविकास आघाडी सरकारने जाता जाता घेतलेल्या औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी आक्षेप घेतला. यावेळी भास्कर जाधव (Shaskar Jadhav) यांनी त्यांना तातडीने सडेतोड उत्तर दिलं. अबू आझमी-भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. मात्र, शहरांची नावे बदलून विकास होतो का? असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. शहरांची नावं बदलून विकास होत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. मात्र नुसतं नाव बदलून काय सांगायचं आहे? शहरांची मुस्लीम नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा त्यांनी केली केली. जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवीन शहर निर्माण करा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने शहर वसवा, टाळ्या वाजवून स्वागत करू, असे अबू आझमी म्हणाले. विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर तुम्ही किती दिवस बसाल याबद्दल शंका; शिवसेनेचे सुनील प्रभू असं का म्हणाले? अबू यांच्या टिकेवर बच्चू कडू यांच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी उठून उत्तर दिलं. मुस्लिमांची नावं काढली जात आहे या वाक्याला आमचा विरोध केला. औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. मुस्लीम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचं आहे असं भास्कर जाधव म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला 17 सदस्य अनुपस्थित, राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या सर्वाधिक संभाजीनगर या आमच्या भावना आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल करुन मारलं. त्याची मजार इथे आहे. आमची श्रद्धा असलेल्या संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्याचं नाव त्या शहराला असेल हे आम्ही सहन करणार नाही. सर्व मुस्लिमांना औरंगजेबाचं नाव मान्य नाही. पालक आपल्या मुलाचं नावं देखील औरंगजेब ठेवत नाही. संभाजीनगर नाव या शहराचं झालं पाहिजे ही आमची भावना आणि मागणी आहे, असं भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Abu azmi, Aurangabad, Shivsena

    पुढील बातम्या