Home /News /mumbai /

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला 17 सदस्य अनुपस्थित, राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या सर्वाधिक

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला 17 सदस्य अनुपस्थित, राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या सर्वाधिक

राष्ट्रावादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने ते आज उपस्थित राह शकले नाहीत. तर आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच आमदारही गैरहजर होते.

    मुंबई, 3 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) आज पार पडली. यात भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. 3 आमदार हे तटस्थ होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आज सभागृहात नव्हते. राष्ट्रावादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने ते आज उपस्थित राह शकले नाहीत. तर आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच आमदारही गैरहजर होते. Assembly Speaker Election : शिंदे सरकार जिंकले, राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणी मतदान केलं नाही? अनुपस्थित सदस्य 1.नवाब मलिक - राष्ट्रवादी 2.अनिल देशमुख - राष्ट्रवादी 3. निलेश लंके - राष्ट्रवादी 4. दिलीप मोहिते - राष्ट्रवादी 5. दत्तात्रय भरणे - राष्ट्रवादी 6. अण्णा बनसोडे - राष्ट्रवादी 7. बबनदादा शिंदे - राष्ट्रवादी 8. नरहरी झीरवळ (अपवाद- मतदान करू शकत नाहीत) 9. मुक्ता टिळक- भाजप 10. लक्ष्मण जगताप- भाजप 11. मुफ्ती इस्माईल- एमआयएम 12. प्रणिती शिंदे- काँग्रेस 13. रणजित कांबळे- काँग्रेस मृत्यू 14. रमेश लटके तटस्थ सदस्य 15. अबू आझमी- सपा 16. रईस शेख- सपा 17. शाह फारुख अनवर - एमआयएम Assembly Speaker Election : शिंदे सरकारने मारली बाजी, अध्यक्षपदासाठी मिळवली 164 मतं कोण आहेत नार्वेकर ? 11 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेले नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर (LLB) असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजपा हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेकडून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जात. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या