Home /News /mumbai /

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! BEST आता हायटेक, प्रवास एकदम भारी होणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! BEST आता हायटेक, प्रवास एकदम भारी होणार

बस थांब्यावर प्रतीक्षा करण्याची गरज संपली. मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट बसने प्रवास करणं आता आणखी सुकर होणार आहे.

मुंबई, 21 डिसेंबर : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट बसने प्रवास करणं आता आणखी सुकर होणार आहे. विशेष म्हणजे बेस्टद्वारे बस, मेट्रोतून प्रवास करण्याकरता नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईची बेस्ट आता हायटेक होणार आहे. प्रवाशांचा प्रवास आणखी चांगला व्हावा यासाठी बेस्ट चलो अ‍ॅप आणि बेस्ट चलो बस कार्डचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रवासी मोबाईल अ‍ॅपवरुन बेस्टचे तिकीट आणि पास खरेदी करु शकणार आहे. तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून अपेक्षित बेस्ट बस ट्रॅकही करता येणार आहे. बेस्ट चलो अ‍ॅपची प्रमुख वैशिष्ट्ये: - बस थांब्यावर प्रतीक्षा करण्याची गरज संपली - बस येण्याच्या लाईव्ह वेळेसहीत बसचा लाईव्ह मागोवा - लाईव्ह प्रवासी संख्या दर्शक : बसमध्ये किती गर्दी आहे हे समजणार. कमी गर्दी असलेली बस निवडता येईल. - मोबाईल तिकिटे आणि पास : सुट्या पैशाची कटकट नाही. कारण पास केंद्रांवर जाण्याची गरज नाही. - 9 भाषांमध्ये उपलब्ध : इंग्रजी, मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू हेही वाचा : सरकारने दारुचे दर कमी का केले? अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण बेस्ट चलो बस कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये: - कोणत्याही संपर्काविना कार्ड टॅप करुन पैसे द्या. कारण तुमचे कार्ड कायम तुमच्याबरोबरच राहणार. - मोबाईल अ‍ॅप वापरुन कोणत्याही बसमध्ये किंवा ऑनलाईन रिचार्ज करता येईल. - आपल्या पसंतीनुसार रिचार्ज करता येईल. 10 च्या पटीत 3000 रुपयांपर्यंत कितीही रकमेचा रिचार्ज करता येईल. - कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही मुदतबाह्य होणार नाही. - 1 जानेवारी 2022 पासून सर्व बसेस आणि शहरातील निवडक केंद्रांवर उपलब्ध बेस्ट एनसीएमसी कार्डची प्रमुख वैशिष्ट्य : बस कार्डाची सर्व वैशिष्ट्ये, अधिक मेट्रो किंवा एनसीएमसीचे पालन करणाऱ्या इतर कोणत्याही प्रणालीमध्ये भारतात सर्वत्र वापरता येईल. बेस्ट सुपर सेव्हर योजनांची वैशिष्ट्ये: - वेगवेगळ्या 72 पर्यायांमुळे प्रवासी प्रति फेरीसाठी योग्य असलेली योजना निवडू शकतात. - प्रति फेरीसाठी 1.99 इतके कमी मूल्य. - निवडलेल्या भाडे टप्प्यामध्ये बेस्ट नेटवर्कमधील वातानुकूलित असलेल्या किंवा नसलेल्या कोणत्याही बसमधून कुठेही प्रवास करा. - मोबाईल अ‍ॅपवर तसेच बस कार्डवरही खरेदी करता येईल. बेस्टच्या कोणत्याही बसमधील कंडक्टरकडून खरेदी करता येईल. हेही वाचा : ओबीसी आरक्षण ते एसटी कर्मचारी संप, सरकार अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार : अजित पवार बेस्ट चलो बस कार्डवरील प्रारंभिक ऑफर्स : - आपल्या पसंतीनुसार रिचार्ज : नवीन कार्डसाठी प्रारंभिक किंमत ₹70 + ₹10 च्या पटीत कितीही रकमेचा रिचार्ज करा. - 10 मोफत फेऱ्यांची ऑफर फक्त 100 रुपयांमध्ये. प्रारंभिक किमत 70 रुपयांमध्ये नवीन कार्ड + प्रत्येकी 10 रुपयांपर्यंतच्या पुढील 10 फेऱ्या मोफत मिळवा (वैधता 2 दिवस). - चलो बस कार्ड हे पैसे देण्याचे बस प्रवासाचे स्मार्ट कार्ड आहे ज्यावरुन तिकिटाचे पैसे रिचार्ज करता येतात आणि त्यावर बस पास किंवा सुपर सेव्हर योजना करण्याची सोय आहे. - हा प्रकल्प 'चलो' या भारतातील आघाडीच्या वाहतूक तंत्रज्ञान कंपनीद्वारे कार्यान्वित करण्यात आला आहे. - या उपक्रमाचा एक भाग म्हणून चलोने बेस्टसाठी बसमध्येच तिकिटे देणारी उपकरणे तसेच स्वयं तिकिटभाडे संकलन करणारा (एएफसीएस) प्लॅटफॉर्मही सुरु केला आहे. - भारतामधील इतक्या मोठ्या प्रमाणातला हा पहिलाच डिजीटल बस प्रकल्प आहे. - या सुधारणेमुळे मुंबईकरांना लंडन, सिंगापूर, आणि हॉंगकॉग यांसारख्या जागतिक दर्जाच्या शहरांपेक्षाही अधिक चांगल्या दर्जाचा डिजीटल बस प्रवासाचा अनुभव येईल. बेस्ट चलो अ‍ॅपवर मोबाईल तिकिटे आणि पास : प्रवासी, अ‍ॅपवर एका प्रवासाचे तिकिट/मासिक पास खरेदी करून फक्त त्यांचा फोन स्कैन करून प्रवास करू शकतात. विद्यार्थ्याचे पास आणि इतर सवलतीच्या दरामधील पासही उपलब्ध आहेत. यूपीआय, नेट बैंकिंग, डेबिट / क्रेडिट कार्ड, वॉलेट्स, आणि इतर सर्व प्रकारच्या ऑनलाईन पद्धतींनी ऑनलाईन पैसे भरता येतात. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) : बेस्ट बस एनसीएमसीच्या माध्यमातूनही पैसे देण्याची सोय करतील, ज्यामुळे मुंबईकरांना एकच सामायिक कार्ड वापरुन भारतात कुठेही बस, मेट्रो आणि एनसीएमसीचे अनुपालन करणाऱ्या इतर वाहनांमधून प्रवास करता येईल. बेस्ट सुपर सेव्हर योजना : बेस्टने नुकत्याच प्रवाशांसाठी 72 वेगवेगळ्या नवीन सुपर सेव्हर योजना जाहीर केल्या, ज्याची प्रवासी निवड करू शकतील. प्रत्येक सुपर सेव्हर योजनेमध्ये एका ठराविक शुल्काच्या बदल्यात फेऱ्यांची विशिष्ट संख्या देऊ केली जाते. योजना एका दिवसापासून ते पार 84 दिवसांपर्यंत आणि 2 फेन्यांपासून 150 फेऱ्यांपर्यंत उपलब्ध आहेत. शुल्क प्रत्येक फेरीसाठी 1.99 रुपये इतक्या कमी मूल्यापासून सुरु होते. या डिजिटल सुविधांच्या सहाय्याने प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा करणे आणि बसमध्ये प्रवासी संख्या वाढवणे हा बेस्टचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे डिजीटल तिकिटांमुळे बेस्टचे रोख रक्कम हाताळण्याचे आणि पेपर रोलचे खर्चही कमी होतील. प्रवासामधील आरोग्य आणि सुरक्षितता यांवर अधिक लक्ष पुरवण्यात येत आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या