मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारने दारुचे दर कमी का केले? अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

सरकारने दारुचे दर कमी का केले? अजित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

File Photo

File Photo

महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) विदेशातून आयात होणाऱ्या मद्यावरील (Liquor) उत्पादन शुल्कात (excise duty) तब्बल 50 टक्क्यांनी कपात का केली याचं उत्तर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 21 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) महिन्याभरापूर्वी विदेशातून आयात होणाऱ्या मद्यावरील (Liquor) उत्पादन शुल्कात (excise duty) तब्बल 50 टक्क्यांनी कपात केली होती. विशेष म्हणजे त्याचवेळी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील (petrol diesel) कर कमी करुन पाच आणि दहा रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त केलं होतं. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विशेष म्हणजे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) उद्यापासून सुरु होतंय. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्क कपातीचा विषय पुढे करत 'वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल', अशा प्रकारचं विधान करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

"मधल्या काळात विदेशी मद्यावर काही प्रमाणात कपात करण्यात आली. त्यावरुन सस्ती दारु, महंगा तेल, असं काहितरी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण मला या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला सांगायाचं आहे की, पहिल्यांदाच तो टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. तो टॅक्स 300 टक्के ठेवण्यात आला होता. माझ्याकडेच उत्पादन शुल्क विभाग आहे. मी सर्व राज्यांची माहिती घेतली. एवढा मोठा टॅक्स इतर राज्यात कुठेही नाही. त्यामुळे तो टॅक्स इतर राज्यांच्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही तो टॅक्स जास्तच आहे. त्यावर अजिबात दुसरी कोणतीही भूमिका नाही", असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : ओबीसी आरक्षण ते एसटी कर्मचारी संप, सरकार अधिवेशनात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार : अजित पवार

"कधीकधी आपण अव्वाच्यासव्वा टॅक्स लावायला लागलो तर लोकांचा करचुकवेगिरीचं प्रमाण वाढतं. बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या गोष्टी इतक्या निर्माण व्हायला लागल्या की त्यामुळे तो निर्णय त्यावेळेस घ्यावा लागला होता", असं अजित पवारांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन महाविकास आघाडी सरकारवर आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी विदेशी मद्याचं उत्पादन शुल्क दर कमी करण्यावरुन राज्य सरकारवर टीका केली होती. "केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा दर प्रतिलिटर पाच आणि दहा रुपये कमी केले. त्यानंतर जवळपास 27 राज्यांनी आपला व्हॅट कमी करुन पट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. पण महाराष्ट्र एकमेवर राज्य असंय ज्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले नाहीत. एकीकडे सांगितलं आमच्याकडे पैसे नाहीत. तर त्याचवेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स 50 टक्के कमी करण्याचं पाप या सरकारने केलं आहे. त्यामुळे हे सरकार कुणाकरता काम करते? पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाहीत. आणि दारुचे भाव कमी करतं. एकीकडे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावेळी जो नारा होता तोच नारा इथे लागू होतो. वारे एमवीए तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था आहे", असा घणाघात फडणवीसांनी केला होता.

First published: