मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांचा कडक पवित्रा, 'सोमवारपासून एकही बस दिसणार नाही'

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांचा कडक पवित्रा, 'सोमवारपासून एकही बस दिसणार नाही'

बेस्ट प्रशासन कामगारांना सुरक्षा कवच देत नाही, स्वतंत्र उपचार सेवा देत नाही अशावेळी कामगारानं स्वतःचं रक्षण स्वतः करावं यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 14 मे : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. यामध्ये बेस्ट कामगार कृती समितीने मोठा निर्णय घेतला आहे. बेस्ट कामगार कृती समितीने सोमवारपासून कामगार कामावर न जाता लॉकडाऊनचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रशासन कामगारांना सुरक्षा कवच देत नाही, स्वतंत्र उपचार सेवा देत नाही अशावेळी कामगारानं स्वतःचं रक्षण स्वतः करावं यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत बेस्टच्या 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कालपर्यंत 95 कर्मचाऱ्यांना कोरॉनाची लागण झाली आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना सुरक्षातमक साधन जसं मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने कृती समितीनं निर्णय घेतला असल्याचं कामगार नेत्यांचं म्हणणं आहे. राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल बेस्ट वर्कर्स युनियनने सोमवारपासून कामगारांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा असताना करोनाच्या या काळात कामगार संघटना काम बंद आंदोलन कशी पुकारू शकते. बेस्ट वर्कर्स युनियन आणि त्यांचे नेते शशांक राव यांच्यावर महाराष्ट्र डिसास्टर अंतर्गत कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. आज राज्यात 1602 नवे रुग्ण सापडले. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही 27524 वर गेली आहे. आज राज्यात 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 1019 वर गेली आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन मुंबईत आज तब्बल 991 रुग्णांनी वाढ झाली. तर आज 512 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत आज 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579 वर पोहचली आहे. आज कोरोणामुळे 25लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 443जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4234 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. धक्कादायक! शस्त्राने वार, मानेवर गोळ्या, चेहऱ्यावर अ‍सिड मग मृतदेह फेकला तलावात
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या