मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्र सरकारचे संकेत; या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन

महाराष्ट्र सरकारचे संकेत; या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 4.0 लागू होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 4.0 लागू होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 4.0 लागू होऊ शकतो.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 14 मे : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackray) सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांत 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा विचार व्यक्त केला आहे. हे भाग कोरोनामुळे अत्यंत प्रभावित झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या ठिकाणांवर प्रतिबंध वाढविण्यासदंर्भात चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने 31 मेपर्यंत मुंबई एमएमआर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लवकरच राज्याचा विचार केंद्राला लिखित स्वरुपात दिला जाणार आहे. 17 मेपर्यंत लॉकडाऊन 3.0 त्यांनी सांगितले की राज्यातील इतर भागांमध्ये 17 मेपर्यंत लॉकडाऊन 3.0 संपण्यापूर्वी केंद्राद्वारा घोषित केल्या जाणाऱ्या दिशानिर्देशांना लागू करण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, जल संसाधन मंत्री जयंत पाटील, शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बुधवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 25,922 रुग्णसंख्या होती. ज्यामध्ये 975 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 15,747 रुग्ण असून 596 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णालय आणि क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. येत्या काळात रुग्णसंख्या वाढू नये असा प्रयत्न आहे. ही पूर्वतयारी असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित -रॉकस्टार आरोग्यमंत्री’; परदेशी मीडियामध्ये केरळच्या मंत्र्यांची तुफान चर्चा 'देव' पाण्यात ठेवणाऱ्यांना उत्तर मिळालं, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
First published:

Tags: Corona virus in india, Udhhav Thakeray

पुढील बातम्या