राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल

राज्यपालांनी मॉडेलला मदत केल्याची बातमी खोटी, सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल

एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून इथे प्रवास करण्यास मदत केल्याचं असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलनं प्रसिद्ध केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 14 मे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटे व बदनामीकारक वृत्त वेबपोर्टलवर प्रसिद्धकरून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांच्यावतीनं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई इथल्या पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून इथे प्रवास करण्यास मदत केल्याचं असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलनं प्रसिद्ध केलं होतं, या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली. राज्यपालांनी जैन उर्फ ​​जयंती ही मॉडेल महाराष्ट्रातून विशेष हेलिकॉप्टरमार्फत दिल्लीत गेली. यानंतर तिला सैन्याच्या गाडीनं देहरादून इथं तित्या घरी पाठवण्यात आल्याचं या पोर्टलमध्ये म्हटलं होतं.

त्याचवेळी, कोश्यारी यांनी केलेल्या विशेष व्यवस्थेमुळे ही मॉडेल तिच्या घरी पोहोचली. यावेळी तिच्या कुटुंबियांना क्वारंटाईन केले असतानाही ती त्यांच्या घरी नियमांचं उल्लंघन करून राहिल्याचं समोर आलं आहे. पण ही बातमी खोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन

या पोर्टलविरोधात राज्यपालांनी तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊलं उचलली असून राज्यात 379 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या 379 गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी 16 गुन्हे अदखलपात्र आहेत.

पुणे पोलिसांचा VIDEO VIRAL, दोघांना अमानुष मारहाण केल्यामुळे नागिरक संतापले

First published: May 14, 2020, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading