जमुई, 14 मे: गुरुवारीच्या पहाटे गावाच्या तलावात मृतदेह आढल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या युवकाच्या मृतदेहाची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला. तीन तासानंतर मृत तरुण हा गावच्या दुसर्या खेड्यातील असल्याचं समोर आलं आहे. लॉकडाऊनमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बनारसी यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. सुमारे पंचवीस वर्षांच्या या युवकाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि मग पुरावा मिटविण्यासाठी त्याचा मृतदेह तलावात टाकण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला फोटो पोलीस येईपर्यंत तलावातील तरुण कोण आहे हे कोणीही ओळखू शकलं नाही. तलावातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सोनो पोलिसांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर त्याची ओळख बनारसी यादव अशी झाली. तो आगरा गावच्या दुसर्या खेड्यात राहत होता. कपड्यांच्या आधारावर मृताच्या पुतण्याची ओळख पटली. मृतदेहाच्या गळ्याला एक छिद्र होतं, ज्यावरून ही हत्या गोळी आणि धारदार शस्त्राने केली गेल्याची भीती व्यक्त गेली आहे, तर कदाचित मृतदेह लपवण्यासाठी त्याला तलावामध्ये फेकला असा पोलिसांचा संशय आहे. मुंबईत धक्कादायक प्रकार, पत्नीने पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी, कारण…. अॅसिडने चेहरा जाळण्याचा केला गेला प्रयत्न अॅसिडने मृताचा चेहरा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. घरातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी घराबाहेर पडला होता, त्यानंतर त्यांनीही शोध घेतला पण तो कुठे आढळला नाही. मृतक बनारसी यादव यांचं बालपणातच लग्न झालं होतं, परंतु त्याची पत्नी कधीही सासरी नाही आली. झाझा एसडीपीओ भास्कर रंजन यांनी सांगितलं की, मृत व्यक्तीचा मृतदेह तलावामध्ये सापडला परंतु त्याच्या कुटूंबियांनी घटनास्थळी येण्यास उशीर केला. लॉकडाऊननंतर मृत बनारसी यादव पाटणा येथून आपल्या घरी परत आला. तो पाटण्यात ऑटो चालवत होता. हा तरुण अनेक दिवसांपासून बेपत्ता होता, परंतु त्याच्या कुटूंबाने पोलिसांना माहिती दिली नव्हती, असं एसडीपीओनं सांगितलं. त्यामुळे या हत्येमागे घरच्यांचा काही हात आहे का? या हत्येमागील कारण काय पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.