Home /News /mumbai /

कारमध्ये असं काय सापडलं की, 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

कारमध्ये असं काय सापडलं की, 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि बाहुबली फेम शिवगामी देवी अर्थात राम्या कृष्णनन (Ramya Krishnan) हिच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

    मुंबई, 13 जून: दाक्षिणात्य अभिनेत्री आणि बाहुबली फेम शिवगामी देवी अर्थात राम्या कृष्णन (Ramya Krishnan)  ही वेगळ्याच अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिचा कार ताब्यात घेवून तिच्या ड्रायव्हरला अटक केली होती. चेन्नई पोलिसांनी राम्याच्या कारमधून 100 हून अधिक दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.  यावेळी राम्या (Ramya Krishnan in police custody) आणि तिची बहीण विनया कृष्णनन कारमध्ये होती. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये पुण्यात तान्ह्या बाळाचा जीवनसंघर्ष, अशी जगतंय फाटलेल्या आभाळाखाली! राम्या आणि विनया या दोन्ही कारने ममलापुरमहून चेन्नईला जात होत्या. चेन्नई पोलिसांनी चेकपोस्टवर कार तपासणीसाठी अडवली. कारची झाडाझडती घेतली असता दारूच्या 104 बाटल्या आढळल्या. नंतर पोलिसांनी राम्यासह तिची बहीण आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका राम्यावर ठेवण्यात आला आहे. 'इंडिया टुडे'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ममलापुरमहून चेन्नई जात असताना राम्या कृष्णनन हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिच्या कारमध्ये बेकायदेशिररित्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. राम्या आणि तिच्या ड्रायव्हरविरुद्ध कनाथूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. राम्या हिने ड्रायव्हरला जामीन मिळवण्यात मदत केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अभिनेत्री राम्या कृष्णनन हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचा.. मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी चालतं-फिरतं बुक हाऊस; गरजुंना तुम्हीही करू शकता मदत दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात चेन्नईमध्ये दारूबंदी आहे. दारूची दुकाने बंद आहेत. तसेच या काळात दारू बाळगण्यासही कायद्यानं बंदी आहे. पोलिसांनी राम्याच्या ड्रायव्हरची जामिनावर सुचका केली आहे. चेन्नईत दारूबंदी असल्यामुळे लोक आजुबाजुच्या जिल्ह्यातून दारूची तस्करी करत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या