जनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब, नंतर कोणी विचारत नाही; अजित पवारांची टोलेबाजी

जनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब, नंतर कोणी विचारत नाही; अजित पवारांची टोलेबाजी

'नियमाने वागा पण कागद वाचण्यापेक्षा त्यामधील माणसाला बघून काम करण्याचा प्रयत्न करा.'

  • Share this:

मुंबई 25 ऑगस्ट:  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्या भावी अधिकाऱ्यांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला. विधिमंडातल्या सभागृहात झालेल्या एका खास कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी तुफान टोलेबाजी करत या भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र देत प्रशासनाला आपला अनुभवही सांगितला.

अजित पवार म्हणाले, जनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब असतो. नंतर कुणी विचारत नाही. तुम्ही मात्र कायमचे साहेब असता. त्यामुळे त्याच प्रमाणे काम करा.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी नशीब घेऊन आलेला मुख्यमंत्री आहे. असा मुख्यमंत्री कधी झाला नसेल. मुख्यमंत्रीपदावर आपण येऊ असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र जे झालं ते तुमच्यासमोर आहे.

माझ्यासमोर महाराष्ट्राचे वैभव बसलेलं आहे. तुमच्यात आणि माझ्यात एक साम्य आहे, ते म्हणजे तुम्ही कठीण परीक्षा देऊन पास झाले आहांत आणि मी सुद्धा कठीण परीक्षा पास झालेलो आहे.आणि दोघांनाही प्रशासनाचा अनुभव नाही.

‘मास्क’ न वापरणाऱ्या लोकांमुळेच भारतात पसरतोय कोरोना, ICMRने दिला गंभीर इशारा

सगळी आपलीच माणसे आहेत, कारण विरोधी पक्षात असलेले माझे सहकारी होते, आधी विरोधी पक्षात असलेले आता माझे सहकारी आहेत. काही जणांना वाटते की मध्यवर्ती परीक्षा व्हाव्यात,  आता तर कोरोनामुळे परीक्षा पण पुढे ढकलल्या जात आहेत.

यावेळी बोलतांना अजित पवार यांनीही आपल्या खास स्टाईलमध्ये प्रशासनात पदार्पण करणाऱ्या या अधिकाऱ्यांना काही सल्लेही दिलेत.

अजित पवार म्हणाले, अधिकारी म्हणून नियमावर बोट ठेवून राहू नका, नियमाने वागा पण कागद वाचण्यापेक्षा त्यामधील माणसाला बघून काम करण्याचा प्रयत्न करा. आमचं कसं आहे की जनतेचा पाठींबा आहे तोपर्यंत साहेब नाहीतर मग कोण विचारत नाही.तुमचं अधिकाऱ्यांचे तसं नाही, तुम्ही शेवटपर्यंत साहेबच राहणार आहात.

Unlock - 4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

फाईल मध्ये नकारात्मक पद्धतीने बघू नका, प्रश्न सोडवण्यावर भर द्या. हा अधिकारी मिळाला पाहिजे किंवा अशी वेळ येऊ देऊ नका की हा अधिकारी आम्हाला नको असं तुम्हाला कुणी म्हणू नये. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा असं सांगत त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 25, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या