Home /News /news /

Unlock - 4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

Unlock - 4 : केंद्राच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्यात शाळा कधी सुरू होणार यावर मोठी चर्चा सुरू होती, त्याला आता केंद्राच्या बैठकीतनंतर पूर्णविराम लागला आहे

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अनलॉक - 4 लागू करण्यात आलं आहे. अनेक मॉल आणि दुकाने नियमांचा अवलंब करीत खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 1 सप्टेंबरनंतर अनलॉक -5  सुरू होईल. यादरम्यान शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जात होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार देशात अद्यार शाळा सुरू करण्यात येणार नाही. नव्याने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही सध्या तातडीने शाळा सुरू होणार नसल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेशसह काही राज्यात 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा विचार सुरू होता. केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. आंध्र सरकारने शाळा सुरू करण्याच्या बातमीवर अनेक पालकांनी विरोध केला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी सरकार 5 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत असल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात मात्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे पालकांच्या संघटनांकडून सध्या शाळा सुरू करण्याला विरोध केला जात आहे. सध्या देशभरात ऑनलाइन शाळा सुरू आहे. ग्रामीण भागात या पद्धतीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये इंटरनेटसारख्या सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र कोरोना सारख्या महासाथीत शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या