मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेता शाहरुख खानचा (sharukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan arrest) अटक प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik ) यांनी पुराव्यानिशी NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. आर्यन खानची अटक ही बनावट आहे, मागील महिन्याभरापासून शाहरुख खान पुढील टार्गेट असणार अशी माहिती पसरवण्यात आली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. शनिवारी एनसीबी (NCB) नं CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. तसंच, आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती दिली जात होती की, पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. SAMEER Recruitment: SAMEER मुंबई इथे ‘या’ पदांच्या 28 जागांसाठी नोकरीची संधी ‘जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत टक्कल असलेला एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. त्यानंतर मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. पुढे मलिक म्हणाले की, अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडिओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडिओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे.
Mrunmayee Deshpande ने रिक्रिएट केला बालगंधर्व यांचा लुक, पाहा Photos
या व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं आहे. के.पी. गोसावीचा एनसीबीसोबत नेमका काय संबंध आहे हे सांगावं? जर हे एनसीबीचे अधिकारी नाही आहेत तर दोन हायप्रोफाईल आरोपींना नेण्याचं काम यांनी कसं केलं? प्रायव्हेट लोकांना हायर करण्याचे अधिकारी NCB ला आहेत का? असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले.