• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • किरण गोसावीबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, पुणे पोलिसांकडून ताबा घेणार?

किरण गोसावीबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, पुणे पोलिसांकडून ताबा घेणार?

मुंबई पोलिसांनी सापडलेल्या पुराव्यात किरण गोसावीबाबतही (Kiran Gosavi) काही पुरावे सापडले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 05 नोव्हेंबर: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Party) प्रकरणी मागण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष तपास पथकाच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती समोर आली आहे. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. या पुराव्यात किरण गोसावीबाबतही (Kiran Gosavi) काही पुरावे सापडले आहेत. यानुसार त्याच्या गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस पुणे पोलिसांकडून किरण गोसावीचा ताबा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानंतर तिला समन्स पाठवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पूजा ददलानीची गाडी CCTV मध्ये कैद मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise drug case) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला (Shah Rukh Khan son Aryan Khan) अटक झाली होती. या प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप झाला आणि एकच खळबळ उडाली. खंडणीचा आरोप झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला महत्त्वाचं सीसीटीव्ही फूटेज (Mumbai Police get important cctv) मिळालं आहे. हेही वाचा- तुमच्या मुलांना वेळ द्या! एका App च्या नादात बदलापूरमधला 13 वर्षीय मुलगा गोव्याला पोहोचला, पण..
   सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला मिळालेलं हे सीसीटीव्ही फूटेज लोअर परिसरातील आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिची निळ्या रंगाची मर्सिडीज कार दिसत आहे. ज्या ठिकाणी ही मर्सिडीज कार दिसत आहे त्याच ठिकाणी 25 कोटींची खंडणीची डील झाली असल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
  सीसीटीव्ही फूटेजमध्ये निळ्या रंगाची मर्सिडीज दिसत आहे. त्यासोबतच शेजारी एक इनोव्हा कारही दिसत आहे. ही इनोव्हा पंच किरण गोसावी याची असल्याचाही पोलिसांना संशय आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आता मुंबई पोलीस तपास करत आहेत. जर पुरावे मिळाले तर किरण गोसावी याच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा-  36 तासात 5 हत्या; यमुना एक्सप्रेस-वेच्या कडेला आणखी 2 महिलांचे मृतदेह
   या सीसीटीव्ही फूटेजनंतर खंडणी प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. खरोखर खंडणी मागितली होती का? ही खंडणी कोणी मागितली होती आणि पैसे कोण घेणार होतं या सर्वांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
  शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी? प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. हेही वाचा-  बॉम्ब फुटणार का? भुजबळांनी दिला देवेंद्र फडणवीसांना आराम करण्याचा सल्ला
   क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
  आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: